Mumbai : पत्नीसह 3 कुत्र्यांनाही मुंबई कोर्टाकडून पोटगी!

Mumbai : पत्नीसह 3 कुत्र्यांनाही मुंबई कोर्टाकडून पोटगी!
Published on
Updated on

मुंबई : कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात मुंबईतील एका न्यायालयाने, पतीला पत्नीसह तिच्या 3 कुत्र्यांनाही पोटगी द्यावी लागेल, असा आदेश दिला आहे. एका 55 वर्षांच्या घटस्फोटित महिलेने पतीने तिच्यासह 3 कुत्र्यांचाही (तिन्ही रोटवेलर्स) खर्च अदा करावा, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. व्यवसायात पतीचे नुकसान झाल्याचा कोणताही ठोस पुरावा नाही, त्यामुळे तो आपली जबाबदारी टाळू शकत नाही.

प्रकरण काय?

महिलेचे 1986 मध्ये लग्न झाले होते. दक्षिणेकडील शहरात दोघे राहायला होते. दोहोंच्या 2 मुलींची लग्ने परदेशात झाली. 2021 मध्ये ही महिला पतीपासून विभक्त होऊन मुंबईत आली. मी आजारी आहे आणि माझ्याकडे उत्पन्नाचे कुठलेही साधन नाही, हेही तिने न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news