Alert For Samsung Users | ‘Samsung’ स्मार्टफोन युजर्संना इशारा; सरकारने दिले ‘फोन अपडेट’चे निर्देश

Alert For Samsung Users
Alert For Samsung Users
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जर तुम्ही दक्षिण कोरियाची टेक कंपनी सॅमसंगचा स्मार्टफोन वापरत असाल तर तुमच्यासाठी सरकारने एक महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. भारत सरकारशी संबंधित कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ऑफ इंडिया (CERT-In) ने म्हटले आहे की, सॅमसंग (Samsung ) स्मार्टफोन युजर्स त्यांच्या डिव्हाइसमध्ये असलेल्या काही त्रुटींमुळे हॅकिंगचे बळी पडू शकतात. त्यामुळे भारत सरकारकडून एका निवेदनाद्वारे तातडीने 'Samsung' स्मार्टफोन सॉफ्टवेअर अपडेट करण्याचे निर्देश युजर्संना दिले आहेत. या संदर्भातील वृत्त 'एनडीटीव्ही'ने दिले आहे. (Alert For Samsung Users)

सरकारने दिलेल्या सूचना या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये असलेल्या सुरक्षेच्या त्रुटींशी संबंधित आहेत. जेणेकरून सॅमसंग युजर्स कोणताही धोका किंवा अडचण निर्माण झाल्यास त्यांच्या स्मार्टफोन आणि डेटाचे संरक्षण करू शकतील. Samsung मधील काही त्रुटींमुळे हॅकर्स युजर्सची संवेदनशील माहिती ऍक्सेस करू शकतात. तसेच सध्याची सुरक्षा व्यवस्था बायपास केली जाऊ शकते हे समोर आले आहे. या दोषांचा सॅमसंगच्या सध्याच्या इकोसिस्टमवर वाईट परिणाम होत आहे, असेही सरकारच्या वतीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. (Alert For Samsung Users)

Alert For Samsung Users: 'या' सॅमसंगच्या मॉडेल्सवर प्रभाव

भारत सरकारकडून CERT-In ने सॅमसंग युजर्संना CIVN-2023-0360 हा इशारा दिला आहे. यामध्ये सॅमसंगची निवडक मॉडेल्स प्रभावित झाले आहे. ही सूचना त्या सॅमसंग स्मार्टफोनसाठी आहे, जे Android आवृत्ती 11, 12, 13 किंवा Android 14 वर काम करतात. सॅमसंग कंपनीचे अल्ट्रा प्रीमियम मॉडेल Samsung Galaxy S23 Series, Galaxy Flip 5 आणि Galaxy Fold 5 Series यांनाही याचा फटका बसला आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

 नॉक्स (Knox) सुरक्षा प्रणालीवर परिणाम

सरकारच्या सायबर सुरक्षा टीमने म्हटले आहे की सॅमसंग स्मार्टफोन मॉडेल्समध्ये अनेक त्रुटी आहेत. त्या कंपनीच्या नॉक्स (Knox) सुरक्षा प्रणाली वैशिष्ट्याशी संबंधित आहेत. सॅमसंग उत्पादनांमध्ये, युजर्संना नॉक्स सिक्युरिटी सॉफ्टवेअरसह अतिरिक्त सुरक्षिततेचा लाभ मिळतो. आता या यंत्रणेतील त्रुटींमुळे सुरक्षा यंत्रणेला बायपास करता येणे हॅकर्संना शक्य आहे. त्यामुळे सॅमसंगने या त्रुटी दूर करणारे अपडेट स्मार्टफोनमध्ये आणले आहे.

'Samsung' युजर्संना फोन अपडेट करण्याचे निर्देश

दरम्यान Samsung कंपनीने युजर्संना हॅकर्सच्या धोक्यापासून वाचण्यासाठी विद्यमान त्रुटी दूर करणारे पॅचेस आणले आहेत. त्यामुळे तुमचे जर Samsung स्मार्टफोन मॉडेल वर दिलेल्यांपैकी असतील तर ताबडतोब डिव्हाइसचे सॉफ्टवेअर नवीनतम आवृत्तीमध्ये अपडेट करा. सरकारने आपल्या ॲडव्हायझरीमध्ये सॅमसंग स्मार्टफोन सिस्टम अपडेट करण्यास सांगितले आहे. तुम्ही सेटिंग्जच्या सॉफ्टवेअर अपडेट विभागात जाऊन नवीनतम आवृत्ती तपासू शकता. याशिवाय, अज्ञात लिंकवर क्लिक करणे किंवा अनोळखी ॲप्स डाउनलोड करणे यासारख्या चुका करू नका, असेही सरकारने दिलेल्या ॲडव्हायजरीमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news