मॅच भारत – बांगलादेशची! पण चर्चा रंगली ॲलन डोनाल्डने राहुल द्रविडच्या मागितलेल्या माफीची

मॅच भारत – बांगलादेशची! पण चर्चा रंगली ॲलन डोनाल्डने राहुल द्रविडच्या मागितलेल्या माफीची

पुढारी ऑनलाईन डेस्क : cricket is a game of chance किंवा cricket is a gentalmens game असं क्रिकेटबाबत नेहमीच ऐकलं किंवा वाचलं जातं. भारतासारख्या देशात क्रिकेट खेळ नाही तर धर्म आहे असंही आपण नेहमी ऐकतो.  पण प्रत्येक क्रिकेटला एक ग्रे शेडही आहे. ती म्हणजे स्लेजिंग. प्रतिस्पर्धी खेळाडूचं मनोधैर्य खच्ची करण्यासाठी अनेकदा काही शब्द किंवा वाक्य उच्चारली जातात. त्याला क्रिकेट जगतात स्लेजिंग म्हणतात.  तर सध्या स्लेजिंग पुन्हा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे ॲलन डोनाल्ड यांनी राहुल द्रविडची मागितलेली माफी. दक्षिण आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज असलेले ॲलन सध्या बांग्लादेशचे बॉलिंग कोच आहेत. त्यांनी राहुलची 25 वर्षांपूर्वी केलेल्या स्लेजिंगबाबत माफी मागितली आहे.

'डर्बन येथे 25 वर्षांपूर्वी खेळल्या गेलेल्या सामन्यात ॲलन यांनी राहुलला वाईट शब्दांनी संबोधलं होतं. त्या संदर्भात माफी मागताना ॲलन म्हणतात. 'मी राहुल यांचा आदर करतो. पण त्या घटनेसाठी मी त्यांची माफी मागू इच्छितो. विकेट मिळावी यासाठी त्यावेळी मी स्लेजिंग केलं. यासाठी मी आजही त्यांची माफी मागतो. राहुल द्रविड जर तुम्ही ऐकत असाल, तर मला तुमच्यासोबत डिनरला जायला आवडेल.'
राहूलच्या बघण्यात हा व्हीडिओ आल्यावर या कूल कोचने तितक्याच कूल अंदाजात उत्तर दिलं. राहूल म्हणतो, 'नक्कीच ते बिल भरणार असतील तर मलाही त्यांच्यासोबत जायला आवडेल.' 1997मध्ये हा सामना खेळला गेला होता. विशेष म्हणजे राहुलने या सामन्यात 84 धावा केल्या होत्या. तर ॲलन यांनीही 3 विकेट घेतल्या होत्या .

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news