Welcome 3: अक्षय कुमारच्या बर्थडेला गुड न्यूज! प्रोमोसोबत ‘वेलकम-३’ची घोषणा

welcome 3
welcome 3

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता अक्षय कुमारच्या वाढदिवसाला चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आगामी चित्रपट 'वेलकम ३' ची घोषणा करण्यात आली असून चित्रपटाचा प्रोमो जारी करण्यात आला हे. खूप मजेशीर प्रोमोसोबत 'वेलकम ३' चे टायटल 'वेलकम टू द जंगल' असे आहे. वेलकम फ्रेंचायजीचा तिसरा चित्रपट आहे. आता या चित्रपटाच्या स्टारकास्टचा खुलासा देखील झाला आहे. दरम्यान, अक्षय कुमारने पोस्ट शेअर केलीय.
अक्षय कुमार, परेश रावल, संजय दत्त, अरशद वारसी, जॉनी लीवर यासारखे कलाकरा या चित्रपटात असणार आहेत. जे आपल्या कॉमेडी अंदाजाने सर्वांना हसायला लावतील. अक्षय कुमारने ट्विट करून प्रोमो शेअर केला आहे. त्याने लिहिलंय- 'स्वत:ला आणि तुम्हा सर्वांना एक बर्थडे गिफ्ट दिलं आहे आज. जर तुम्हाला आवडलं आणि तुम्ही धन्यवाद म्हणाल तर, मी 'वेलकम' (३) म्हणेन.'

प्रोमो कॉमेडीने भरपूर आहे. जियो स्टुडिओच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवर या चित्रपटाचा प्रोमो जारी केला आहे. प्रोमोमध्ये जंगल दिसते. संपूर्ण कलाकार जंगलमध्ये उभारलेले दिसते. यानंतर 'वेलकम' गाणे गाताना दिसतात.

वेकलम ३ मध्ये अक्षय कुमार, दिशा पाटनी, रवीना टंडन, संजय दत्त, अरशद वारसी, लारा दत्ता, परेश रावलसह अनेक दमदार स्टार्स दिसणार आहेत. हा चित्रपट याचवर्षी रिलीज होईल. कॉमेडी चित्रपटाची रिलीज डेट २० डिसेंबर २०२४ आहे. अहमद खानद्वारा दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि फिरोज नाडियाडवाला करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news