Housefull 5 : ‘भूल भुलैया ३’ शी क्लॅश नाही; अक्षयच्या ‘हाउसफुल ५’ ची बदलली रिलीज डेट

Housefull 5
Housefull 5

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी कॉमेडी 'हाऊसफुल ५' ( Housefull 5 ) चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर २०२४ रोजी रिलीज होणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी केली होती. आता चित्रपटाच्या रिलीज डेटविषयी नवी अपडेटस् समोर आली आहे. आता 'हाऊसफुल ५' चित्रपटाची रिलीज डेट बदलून हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे. यामुळे चाहत्यांनी अजून प्रतिक्षा करावी लागणार आहे.

संबंधित बातम्या 

निर्माता आणि चित्रपट विश्लेषक तरूण आदर्श यांनी त्याच्या एक्स (x) टविट्वर आगामी 'हाऊसफुल ५' ( Housefull 5 ) चित्रपटाच्या रिलीज डेटविषयीची माहिती देताना एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी 'हाऊसफुल ५' चित्रपटाची बदललेल्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. हा चित्रपट आता ६ जून २०२५ रोजी रिलीज होणार आहे.

हा चित्रपट याआधी दिवाळीच्या मुहूर्तावर २०२४ रोजी रिलीज होवून अभिनेता कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया ३' चित्रपटाला टक्कर देणार होता. दरम्यान निर्मात्यांनी 'हाऊसफुल ५' चित्रपटाची रिलीज डेट बदलून ६ जून २०२५ करण्यात आली आहे. यामुळे अक्षयच्या चाहत्यांना चित्रपटासाठी अजून काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे.

अक्षय कुमारसोबत चित्रपटात अभिनेता रितेश देशमुख यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. 'हाऊसफुल' या चित्रपटाच्या पहिल्या चार भागांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. यानंतर 'हाऊसफुल ५' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आल्यावर धमाका करेल असी आशा निर्मात्यांनी व्यक्त केली आहे. या चित्रपटात आणखी कोणकोणते कलाकार असणार यांची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news