Bade Miyan Chote Miyan : अक्षय-टायगरच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ च्या सीनला कात्री तर…; उद्या होणार रिलीज

Bade Miyan Chote Miyan Trailer
Bade Miyan Chote Miyan Trailer

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' ( Bade Miyan Chote Miyan ) हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर म्हणजे, गुरुवारी ( दि.११ एप्रिल ) रोजी प्रदर्शित होणार आहे. याआधी हा चित्रपट १० तारखेला रिलीज होणार होता. मात्र, ईद ११ तारखेला आल्याने चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. दरम्यानच निर्मात्यांनी स्वतः रिलीजच्या आधीच चित्रपटातील काही सीनला कात्री लावली आहे. तर नव्याने ६३ सेकंदांचा सीनही जोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित बातम्या 

यापूर्वी अली अब्बास जफर दिग्दर्शित 'बडे मियाँ छोटे मियाँ' ( Bade Miyan Chote Miyan ) चित्रपपटातील काही सीनला सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली होती. यामध्ये १४ सेकंदाचा सीन काढून टाकण्यात आला होता. तसेच २५% ने सीन कमी करण्याची सूचनाही दिली होती. यानंतर आता स्वत: निर्मात्यांनी चित्रपट कमी कालावधीसाठी २ तास ४४ मिनिटांवरून २ तास ३८ मिनिटांवर करण्यात आला आहे. दरम्यान रिपोर्टच्या माहितीनुसार, एकूण ७ मिनिटे ३ सेकंदांचे सीन हटविण्यात आला आहे. तर ६३ सेकंदांचा नवा सीन जोडण्यात आला आहे. एकूण १३ सीनला कात्री लावली आहे.

दरम्यानच अक्षयने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आल्याचे सांगितले आहे. यात त्याने म्हटलं की, "मी आणि टायगर अबुधाबीमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेलो होतो. तेथेच आम्हाला ईद ११ तारखेला असल्याने चित्रपट ११ तारखेला रिलीज होणार असल्याचे समजले. त्यामुळे चाहत्यांनी थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे. "

'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट वासू भगनानी आणि जॅकी भगनानी यांच्या पूजा फिल्म्सच्या बॅनरअतर्गत बनला आहे. चित्रपटाचे एकूण बजेट ३५० कोटी रुपये आहे. त्यामुळे निर्मात्यासह कलाकार कोणतीही कसर कमी पडू देत नाहीत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news