तुला शिकवीन चांगलाच धडा : अक्षराला अधिपतीकडून दिवाळीची अनोखी भेट!

तुला शिकवीन चांगलाच धडा
तुला शिकवीन चांगलाच धडा

पुढारी ऑनलाईन डेस्क : नव्या जोडप्याला लग्नानंतरच्या आवर्जून प्रतीक्षा असते दिवाळीतल्या पाडव्याची. झी मराठीवर 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेत ही अक्षरा- अधिपतीची पहिली दिवाळी आहे. अक्षरा ही दिवाळी खास बनविण्यासाठी स्वतः आकाश कंदील बनवतेय, जो पाहून अधिपती तिच्या पुन्हा प्रेमात पडतो.

संबंधित बातम्या 

अक्षराने बनवलेला आकाश कंदील अधिपती कौतुकाने घरासमोर लावतो. भुवनेश्वरी तो कंदील पाहते आणि अधिपतीकडे हट्ट धरते, की तिने आणलेला आणि सूर्यवंशींच्या श्रीमंतीला शोभेल असाच आकाश कंदील घरासमोर लागला पाहिजे. आता अधिपती, आईचा हट्ट पुरवणार की बायकोचं मन सांभाळणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

अक्षराचा लग्नानंतरचा हा पहिलाच पाडवा आहे. त्यामुळे मास्तरीणबाईंना काहीतरी खास द्यायचं आहे. यामुळे अधिपती अशी एक वस्तू देणार आहे ज्यामुळे मास्तरीणबाईंचा चेहरा आनंदानी फुलून जाणार आहे. काय होईल जेव्हा भुवनेश्वरीला कळेल अधिपतीच्या या दिवाळी भेटीबद्दल?. यामुळे 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेबद्दल चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news