‘इंडिया’ आघाडीच्‍या सभेला ‘सपा’ प्रमुख अखिलेश यादव गैरहजर, जारी केले निवेदन

समाजवादी पार्टी प्रमुख अखिलेश यादव. (संग्रहित छायाचित्र )
समाजवादी पार्टी प्रमुख अखिलेश यादव. (संग्रहित छायाचित्र )

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत दाखल झाली असून, आज शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची सभा पार पडत आहे. या सभेच्या निमित्ताने इंडिया आघाडीच्या लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ मुंबईतून फुटणार आहे. दरम्‍यान, या सभेला समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव गैरहजर राहिले. त्‍यांनी एक निवदेन जारी करत आपल्‍या गैरहजरीचे कारण सांगितले आहे.

अखिलेश यादव यांनी आपल्‍या निवेदनात म्‍हटलं आहे की, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशमध्‍ये बुधवार, २० मार्चपासून नामंकनाच्‍या तारखा जाहीर केल्‍या आहेत. त्‍यामुळे मी मुंबईत मी भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाही."

इंडिया आघाडी प्रचाराचा नारळ आज मुंबईतून फुटणार

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत दाखल झाली असून, आज शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची सभा पार पडत आहे. या सभेच्या निमित्ताने इंडिया आघाडीच्या लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ मुंबईतून फुटणार आहे.

इंडिया आघाडीच्या सभेच्‍या विराट सभेसाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुक नेते एम. के. स्टॅलिन, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे उपस्थित  आहेत. या सभेनंतर  इंडिया आघाडीच्‍या नेत्‍यांची बैठक होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news