व्यावसायिक गुंतवणूक, प्रश्न तसेच समस्यांच्या दृष्टीनेच अदानी व पवार भेट : अजित पवार

व्यावसायिक गुंतवणूक, प्रश्न तसेच समस्यांच्या दृष्टीनेच अदानी व पवार भेट : अजित पवार
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: उद्योगपती गौतम अदानी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या या पुर्वीही भेटी झाल्या आहेत. उद्योग करताना येणार्‍या अडचणी, समस्या तसेच विविध प्रश्न यांबाबत या भेटीमध्ये चर्चा होत असते. देशातील विविध उद्योगपती वेगवेगळ्या राज्यात गुंतवणूक करत असतात आणि ते त्या राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेत असतात. अदानीच्या बाबतीत हिडेनबर्गचा प्रश्न निघाला असला तरी त्यांच्या विविध राज्यात गुंतवणूक तसेच प्रकल्प सुरू असल्याचे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले.

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड तोलणार पगारदार नोकरांची सहकारी पतसंस्थेच्या 25 व्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, उद्योगपती गौतम अदानी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीवर विचारलेल्या प्रश्नावर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news