Sharad Pawar vs Ajit Pawar : शरद पवारांचे मोठे विधान, म्हणाले; ‘अजित पवार परके नाहीत पण…’

Sharad Pawar vs Ajit Pawar : शरद पवारांचे मोठे विधान, म्हणाले; ‘अजित पवार परके नाहीत पण…’

पुढारी ऑनलाईन डेस्क : sharad pawar vs ajit pawar : भारतीय जनता पक्षाकडून आज जाती-जातीत, समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे. धार्मिक भेद निर्माण करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवले जात आहे. या भाजप विरोधात आम्ही संघर्ष करत आहोत. पण आमचे सहकारीच त्यांच्यासोबत गेले, अशी खंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. सातारा येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महाराष्ट्राचा पुन्हा झंझावाती दौरा करणार

शरद पवार पुढे म्हणाले की, कराडमधून आज मी पुन्हा नव्याने सुरुवात केली आहे. सातारा, कोल्हापूरने राष्ट्रवादीला नेहमीच बळ दिले आहे. नव्या पिढीला नाउमेद होऊ देणार नाही. त्यासाठी महाराष्ट्राचा पुन्हा झंझावाती दौरा करणार आहे. यापुढे नव्या कार्यकर्त्यांना संधी देणार असून येत्या काळात महाराष्ट्राचे चित्र पालटणार आहे,' असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.

नव्या दमाचे रक्त राज्याचे चित्र बदलवून टाकेल

ते पुढे म्हणाले, नव्या दमाचे रक्त राज्याचे चित्र बदलवून टाकेल हा विश्वास आहे. आज माझ्या स्वागतासाठी 70 ते 80 टक्के तरुणाई होती. आपण निवडलेले सहकारी सोडून जाणे हे माझ्यासाठी नवीन नाही. भाजप सोबत जे गेले आहेत त्यांच्या जाण्यामागे ईडीची कारवाई हे कारण नाही. मोदींचे आरोप वास्तवादी नाहीत, असेही शरद पवार म्हणाले. (sharad pawar vs ajit pawar)

अजित पवार म्हणजे संपूर्ण पक्ष नव्हे

अजित पवार म्हणजे संपूर्ण पक्ष नव्हे असा टोलाही शरद पवार यांनी यावेळी लगावला. पण अजित पवार हे कुणी परके नाहीत. त्यांच्याशी मतभिन्नता असू शकते, अशी सारवासारवही शरद पवारांनी केली.

काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होण्यास हरकत नाही

माझ्या माहिती प्रमाणे आता महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षांचा विचार केल्यास त्यात काँग्रेसकडे सर्वात जास्त सदस्य संख्या आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर म्हणून त्यांनी दावा केल्यास त्याला माझी हरकत नाही, असेही शरद पवारांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news