पुढारी ऑनलाईन डेस्क : सरकारी नोकरीत ५८ व्या वर्षी निवृत्ती आहे. केंद्र सरकारच्या नोकरीत ६० व्या वर्षी निवृत्ती होते. राजकारणातही निवृत्तीला काही ठरावितक वय आहे. मात्र, काही जण ८४ वर्ष वय पूर्ण झाले तरी, काही जण थांबायला तयार नाहीत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा एकदा टोला लगावला. ते कल्याणमध्ये राष्ट्रवादीच्या मेळाव्यात आज (दि.७) बोलत होते. Ajit Pawar On Sharad Pawar
पवार म्हणाले की, वय झाले की, थांबायचे असते. पण काही जण हट्टीपणा करतात. कुठे तरी थांबा, आम्ही कामे करायला समर्थ आहोत. कोरोनाच्या काळात काही जणांनी मला सल्ला दिला की, मंत्रालयात जाऊ नका, कोरोना होईल, पण मेलो तरी चालेल तरी, लोकांची कामे करत राहणार, असा निर्धार करून मी रोज सकाळी ८ वाजता मंत्रालयात जात होता.
दुसरीकडे नाव न घेता जितेंद्र आव्हाड यांना वाचाळवीर असे संबोधत उपमुख्यमंत्री पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता त्यांचं वाढलेले वय आणि निवृत्ती बाबत टीकास्त्र सोडले. ८४ वय झाले तरी काही जण निवृत्त होण्यास, थांबण्यास तयार नाहीत, किती हट्टीपणा, ऐकायला तयार नाहीत, त्यामुळे आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी भाजप सोबत गेल्याच्या भूमिकेचे समर्थन केले. तर प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी पवार यांच्या भूमिकेचे समर्थन करताना आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कडाडून टीका केली.
त्यांना खोटे बोलण्याचे डॉक्टरेट दिले पाहिजे असे सांगताना २०१९ मध्ये अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली नसती तर महविकास आघाडी सरकार टिकले नसते, असा दावा तटकरे यांनी आव्हाड यांच्या टीकेला उत्तर देताना केला आहे. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, आनंद परांजपे, नजीब मुल्ला, आमदार दौलत दरोडा यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
हेही वाचा