Ajay Devgn Maidaan Trailer : दमदार स्टाईलमध्ये आला अजय देवगनच्या ‘मैदान’चा ट्रेलर

अजय देवगन
अजय देवगन

पुढारी ऑनलाईन डेस्क : अजय देवगन (Ajay Devgn) सध्या तो त्याच्या दोन बॅक टू बॅक चित्रपटांमुळे चर्चेत आहे. त्याचे 'शैतान' आणि 'मैदान' हे दोन चित्रपट रिलीज होणार आहेत. दरम्यान, अजयच्या मैदान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. याआधी टीझर रिलीज झाला होता. टीझरमध्ये मैदानच्या ट्रेलरची तारीख जाहिर करण्यात आली होती. आता अजयच्या फॅन्सची प्रतीक्षा संपली असून अजयच्या मैदानचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

'मैदान' चित्रपटात अजय देवगनची दमदार स्टाईलमध्ये मिळणार आहे. भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्या भूमिकेत अजय आहे. साऊथ अभिनेत्री प्रियामणी आणि गजराज राव हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

फुटबॉलच्या गोल्डन युगाला दर्शवणारा चित्रपट

'मैदान'ची कहाणी फुटबॉलच्या गोल्डन पीरीयडला दर्शवते. १९५२ ते १९६२ पर्यंत फुटबॉल खेळाचा गोल्डन पीरीयड चित्रपटात दाखवण्यात आला आहे. हा फुटबॉलच्या इतिहासाचा गोल्डन पीरियड मानलं जातं. हा चित्रपट एक बायोग्राफिकल स्पोर्ट्स ड्रामा असेल, त्याचे दिग्दर्शन अमित शर्मा यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news