Shaitaan १०० कोटी पार! सहाव्या दिवशीही कोटींची कमाई

shaitaan movie
shaitaan movie

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ अभिनेत्री ज्य़ोतिका आणि अजय देवगन यांचा हिट चित्रपट शैतानने कमाई बाबतीत १०० कोटींचा आकडा पार केला आहे. अजय देवगनचा सुपरनॅच्युरल हॉरर चित्रपट 'शैतान' यावेळी बॉक्स ऑफिसवर आपली जादू चालवत आहे. या चित्रपटामध्ये आर माधवनच्या अभिनयाचे कौतुक होत आहे.

या चित्रपटाने रिलीजच्या पाच दिवसांमध्येच वर्ल्डवाईड १०० कोटी रुपये कमावले होते. अजय देवगन आणि आर माधवन स्टारर चित्रपटाने बुधवारपर्यंत १००.२५ कोटी रुपये कमावले आहेत.

रिपोर्टनुसार, 'शैतान' ने पहिल्या दिवशी १४.७५ कोटी रुपये कमावले होते. दुसऱ्या दिवशी १८.७५ कोटी, तिसऱ्या दिवशी २०.५ कोटी, चौथ्या दिवशी ७.२५ कोटी, पाचव्या दिवशी ६.५ कोटी आणि सहाव्या दिवशी ६.२५ कोटी रुपये कमावले होते. चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनशी संबंधित सातव्या दिवसाचे आकडे देखील समोर आले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news