Aishwarya Narkar : ऐश्वर्याकडून म्हातारचाळे म्हणणाऱ्यांची बोलती बंद

Aishwarya Narkar : ऐश्वर्याकडून म्हातारचाळे म्हणणाऱ्यांची बोलती बंद
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठीतील प्रसिद्ध जोडपे म्हणून अभिनेत्री ऐश्वर्या नारकर ( Aishwarya Narkar ) आणि अभिनेता अविनाश नारकर यांची ओळख आहे. ऐश्वर्याच्या सौदर्याची आजही चाहत्यांवर भूरळ आहे. सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून ऐश्वर्या तिच्या सौदर्यांची जादू दाखवून सतत चर्चेत असते. आताही तिच्या पती अविनाश नारकरसोबतच्या रोमॅटिक व्हिडिओनं चर्चेत आली आहे. या व्हिडिओवरून ऐश्वर्याला जोरदार ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. दरम्यान पुन्हा एकदा सोशल मीडियावरून तिने ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

संबधित बातम्या 

अभिनेत्री ऐश्वर्या नारकरने ( Aishwarya Narkar ) गेल्या काही दिवसांपूर्वी पती आणि अभिनेता अविनाश नारकर सोबतचा एक व्हिडिओ इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत ऐश्वर्याने ऑरेंज आणि जांभला रंगाची साडी तर अविनाशने व्हाईट रंगाचे घोचर आणि उपरण परिधान केलं आहे. दोघे कपल 'रुप तेरा मस्ताना' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. पहिल्यांदा वरील वेशभूषेत आणि नंतत हे कपल साध्या कपड्यातदेखील दिसतात. याशिवाय ऐश्वर्याने नाकात नथ, कानात झुमके, केसांत गजरा आणि हिरव्या रंगाच्या हातात बांगड्या घातल्या आहेत.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी 'कपल गोल्स, बदल तुमच्या आयुष्याचा भाग आहे. फक्त चांगले बनण्याचा प्रयत्न करा. एकमेकांशी संवाद साधा. सर्व शेअर करा. बोलून मोकळे व्हा. एकमेकांचे मित्र व्हा. एकमेकांना कोणत्याही परिस्थितीत साथ द्या. तुम्ही पती आहात किंवा पत्नी हे महत्त्वाचे नाही. आयुष्य तुम्हाला नक्कीच सुखाच्या वाटेवर घेऊन जाईल. प्रयत्न करून पाहा,' असे लिहिले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. दरम्यान काही युजर्सना कपलचा डान्स पसंतीस उतरला तर नेटकऱ्यांना त्याचे हे वर्तन खटकले आहे. 'म्हातारचाळे करणारे आजी-आजोबा' अशी कॉमेन्टस व्हिडिओला करत नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

यानंतर ऐश्वर्याने ट्रोल करणाऱ्याना सडेतोड उत्तर दिलं आहे. यात तिने म्हटलं आहे की, 'बुद्धी गंजेल असा विचार करून, तुमच्या घराण्यात म्हातारचाळ लागण्याचा रोग आहे वाटतं. जगून घ्या, गेलात तर दुसऱ्यांना बोलणे सगळंच राहून जाईल. म्हातारचाळचा अर्थही बघून घ्या जरा.. बुद्धी भ्रष्ट.' यामुळे सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्याची बोलती बंद केली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news