Aishwarya Narkar : ऐश्वर्या नारकरच्या सौंदर्याचे ‘हे’ आहे खास रहस्य

ऐश्वर्या नारकर
ऐश्वर्या नारकर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ह्या मालिकेत ऐश्वर्या नारकर ह्या 'रुपाली राज्याध्यक्ष' ची भूमिका साकारतात आहे. त्या कामामध्ये बिझी (Aishwarya Narkar) असूनही फिटनेस व निरोगी जगण्यासाठी काय काय करतात व कसा वेळ देतात ह्या बाबतीत त्यांनी नुस्के सांगितले आहेत. (Aishwarya Narkar)

संबंधित बातम्या –

ऐश्वर्या नारकर ह्या गेल्या वीस वर्षा पासून जिम व वेट ट्रेनिंग करत आहे आणि नुकतेच त्यांनी योग सराव करायला सुरवात केली आहे. त्यांच्या सुंदर त्वचेचे व दाट केसांचे रहस्य व्यायाम आणि शुद्ध आहारच आहे. या फिटनेस जीवनशैलीला घेऊन त्यांनी आपले मत व्यक्त करतांना सांगितले की, माझा दिवस सकाळी ५:३० वाजता सुरु होतो आणि शूटिंगला जाण्याची तयारी करून त्या नंतर रोज अंदाजे ३०-४० मिनिटे योग करते ज्याच्याने मला स्फूर्ती व मनाची शांती मिळते.

योग मी माझ्या पुतणीकडून शिकते आहे जी एक योग प्रशिक्षक आहे. व्यायाम करण्यासोबत मी पौष्टिक आहार घेते. गव्हाचे आणि तळलेले पदार्थ शक्यतो टाळते व माझा सगळा आहार शुद्ध तुपामध्ये बनतो.

भात हा पदार्थ माझ्या आहारात लहानपणापासून आहे आणि सगळ्यांना माझं एवढचं म्हणणं असेल की, तुमच्या लहानपणीच्या खाण्याच्या सवयी मोडू नका. आपल्या आयुष्यात समतोल आणि सातत्य ठेवले की, आपलं आरोग्य निरोगी राहत. माझ्यासाठी निरोगी राहण्याचे मंत्र म्हणजे झोप, पौष्टीक आहार आणि व्यायामच आहे."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news