पुढारी ऑनलाईन डेस्क : दसर्यानंतर सुरु होणार्या सणासुदीच्या दिवसांमध्ये हवाई प्रवासाच्या मागणीत लक्षणीय वाढ होते. याचाच अंदाज घेत दिवाळीच्या काळात देशातंर्गत विमान तिकिटाचे दरात कंपन्यांनी मोठी वाढ केली आहे. ( Airfare increase ) काही मार्गांवरील तिकीट दरात तब्बल ४०० टक्के वाढ झाल्याचे दिसत आहे. २२ ऑक्टोबर रोजी होत असलेल्या विमान तिकीट बुकिंगमध्ये हे दर वाढल्याचे स्पष्ट होत आहे.
दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि चेन्नई या महानगरांतील दिवाळीच्या दिवासांमधील हवाई प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. २२ ऑक्टोबर २०२२ रोजी दिल्ली ते पाटणा हवाई प्रवास करणार्यांना १५ हजार ७५८ रुपये मोजावे लागणार आहेत. तर २३ ऑक्टोबरसाठी ११ हजार ९९० रुपये मोजावे लागतील. याच मार्गावरील हवाई प्रवासासाठी आज (दि. ४ ) केवळ ४हजार ३७९ रुपये इतका तिकिट दर आहे.
२२ ऑक्टोबर २०२२ रोजीच्या मुंबई ते पाटणा हवाई तिकिट बुकींगसाठी आता १९ हजार ७५१ रुपये मोजावे लागत आहेत. आज या तिकिटाचे शुल्क ५ हजार ७९९ इतके होते. २२ ऑक्टोबर रोजी हैदराबाद ते पाटणा हवाई प्रवाासाठी १६ हजार १३२ रुपये तिकिटा खर्च असून, आज या मार्गावरील हवाई प्रवास हा साडेसात हजार रुपयांमध्ये होत आहे.
दिल्ली आणि चेन्नई हवाई प्रवासाठी ६ हजार १६५ रुपये तिकीट होते. या प्रवासासाठी २२ ऑक्टाटेबरला ७ हजार ९४९ रुपये द्यावे लागणार आहेत. हैदराबाद ते लखनौ हवाई प्रवास ६ हजार २३२ रुपयांमध्ये होत आहे. तोच २२ ऑक्टोबर रोजी १२ हजार ८४९ इतका झाला आहे.
यंदा दिवाळी हंगात तिकिट बुकींगच्या चौकशीत मागील वर्षाच्या तुलनेत ५० ते ६० टक्के वाढ झाली आहे. आम्ही देशांतर्गत हवाई प्रवासाच्या बुकिंगसाठी मोठे मागणी झालेल्याचे दिसत आहे. देशांतर्गत हवाई प्रवासातील वाढ दिसत आहे. तब्बल यापुढे ९० टक्के वाढ दिसत आहे. पर्यटन व्यवसाय पुन्हा एका रुळावर येण्याचे हे संकेत असल्याचेही मानले जात आहे.
हेही वाचा :