Pollution In Delhi | दिवाळीत दिल्लीसह एनसीआरमधील हवा प्रदूषित; श्वास घेणेही अवघड

Pollution In Delhi | दिवाळीत दिल्लीसह एनसीआरमधील हवा प्रदूषित; श्वास घेणेही अवघड

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत वायू गुणवत्ता मंगळवारी सकाळी 'अत्यंत वाईट' श्रेणीत  (Pollution In Delhi) पोहोचली. दिवाळीच्या रात्री मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या आतषबाजीमुळे दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील नोएडा, गुरुग्राममधील वायू गुणवत्ता निर्देशांत ३४२ नोंदवण्यात आला. हवामानासंबंधी पुर्वानूमान तसेच संशोधन करणाऱ्या 'सफर' कडून दिवाळी दरम्यान राज्यातील वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 'गंभीर' स्तरावर पोहोचणार असल्याचे भाकिते अगोदरच वर्तवण्यात आले होते.

आज, मंगळवारी सकाळी एक्यूआय अत्यंत वाईट श्रेणीतील (Pollution In Delhi)  नोंदवण्यात आला. दिल्लीत एक्यूआय ३२३ नोंदवण्यात आला. ३०१ ते ४०० दरम्यान श्रेणीतील एक्यूआय अत्यंत खराब मानला जातो. या श्रेणीतील वातावरणात श्वास घेतल्याने श्वासोश्वासाचे विकार होण्याची शक्यता बळावते.

नोएडा तसेच दिल्लीतील वायू गुणवत्ता निर्देशांक ४०१-५०० या 'गंभीर' श्रेणीतून केवळ एक पाऊल मागे आहे. ही हवा लोकांच्या आरोग्याला प्रभावित करू शकते. दिल्लीतील लोधी रोड परिसरातील एक्यूआय मंगळवारी सकाळी २७३, गुरूग्रामचा २४५ तसेच मथुराचा ३२२ नोंदवण्यात आला. सोमवारी रात्री करण्यात आलेल्या आतषबाजीमुळे दिल्ली आणि एनसीआरमधील वायू प्रदूषणाचा स्तर मध्यरात्री वाढला. परंतु, अनुकूल वातावरण तसेच हवामानातील बदलानंतर मध्यरात्रीनंतर वायू गुणवत्तेत सुधारणा दिसून आली. मिळालेल्या आकडेवारीनुसार सोमवारी आतषबाजीमुळे रात्री ८ ते मध्यरात्री १ पर्यंत प्रदूषणात वाढ दिसून आली होती.

Pollution In Delhi : दक्षिण दिल्लीतील हवा सर्वाधिक प्रदूषित

दक्षित दिल्लीतील हवा सर्वाधिक प्रदूषित असल्याची माहिती समोर आली आहे. क्षेत्रातील आरके पुरम, ओखला, करनी सिंहू शूटिंग रेंज, जवाहरलाल नेहरू स्टेडियम परिसरात अत्यंत निष्कृष्ट दर्जाचा एक्यूआय नोंदवण्यात आला. यासोबतच गाझियाबाद ३०१, नोएडा ३०३, ग्रेटर नोएडा २७०, गुरूग्राम ३२५ तसेच फरीदाबादमध्ये वायू गुणवत्ता निर्देशांक २५६ नोंदवण्यात आला. ० ते ५० दरम्यानचा एक्यूआय चांगल्या श्रेणीतील असतो. ५१ ते १०० दरम्यानचा एक्यूआय समाधानकारक, १०१ ते २०० श्रेणीतील एक्यूआय मध्यम, २०१ ते ३०० श्रेणी खराब, ३०१ ते ४०० श्रेणी अत्यंत खराब, ४०१ ते ५०० श्रेणी गंभीर मानली जाते.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news