हवेच्या कमी दाबामुळे राज्यातील हवा प्रदूषित; एन्फ्लूएन्झाचे विषाणू सक्रिय

हवेच्या कमी दाबामुळे राज्यातील हवा प्रदूषित; एन्फ्लूएन्झाचे विषाणू सक्रिय

पुणे; पुढारी वृत्तसेवा : बंगालच्या उपसागरात वारंवार तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा प्रथमच नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये थंडी खूप कमी दिवस जाणवत आहे. सतत ढगाळ वातावरणामुळे हिवाळ्यात चक्क उकाडा जाणवत आहे. अशा विचित्र वातावरणामुळे एन्फ्लूएन्झा या विषाणूचा प्रभाव वाढल्याने आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. असे वातावरण अजून तीन दिवस राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. काही दिवसांपूर्वीच बंगालच्या उपसागरात मंदौस हे चक्रीवादळ आल्याने दक्षिण भारताकडून महाराष्ट्राच्या दिशेने बाष्पयुक्त वारे वाहत आहे.

अरबी समुद्रातही नुकताच कमी दाबाचा पट्टा तयार झाला व हवेचा दाब कमी झाल्याने सर्व बाजूंनी बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राकडे येत आहे. सतत तयार होणार्‍या या कमी दाबाच्या पट्ट्यांनी यंदा नोव्हेंबरमध्ये फक्त दहा दिवस थंडी जाणावली. डिसेंबर हा कडाक्याचा थंडीचा महिना असतो. मात्र या माहिन्याचा पहिला आठवडा थंडीविनाच गेला. आता दुसरा आठवडाही पावसाळी वातावरणात जाणार आहे.

दिवसा कडक ऊन वाढते, तर पहाटे थंडीचा कडाका
वातावरणात अचानक उष्णता वाढून दिवसा कडक उन वाढते, तर पहाटे व उत्तर रात्री थंडीचा कडाका जाणवत आहे. त्यामुळे एन्फ्लूएन्झा व पॅरा एन्फ्लूएन्झा या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढून नागरिक आजारी पडत आहेत. तसेच श्वसनाचे आजार वाढले आहेत. ज्यांना फुफ्फुसाचे आजार आहेत, त्यांना या वातावरणाचा त्रास होत आहे. मात्र, कोरोना व स्वाईन फ्लूचा प्रभाव पुन्हा वाढण्याचा धोका नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

सतत मास्क वापरा, पाणी भरपूर प्या
पिकांवरही किडीचा प्रादुर्भाव
नोव्हेंबरमध्ये फक्त दहा दिवस जाणवली थंडी
डिसेंबरचा पहिला पंधरवडा विनाथंडीचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news