पुंछमध्ये हवाई दलाच्या वाहन ताफ्यावर दहशतवादी हल्ला; पाच जवान जखमी

पुंछमध्ये हवाई दलाच्या वाहन ताफ्यावर दहशतवादी हल्ला; पाच जवान जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा भ्याड हल्ला केला. सुरनकोटमध्ये दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनाच्‍या ताफ्‍यावर गोळीबार केला. याहल्ल्यात पाच जवान जखमी झाल्‍याच वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.

जखमी जवानांना उपचारासाठी उधमपूर येथील कमांड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. स्थानिक राष्ट्रीय रायफल्स युनिटने परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरू केली आहे. शाहसीतारजवळील जनरल परिसरात हवाई तळाच्या आत वाहने सुरक्षित करण्यात आली आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news