असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबारानंतर ओवेसींना केंद्राकडून झेड दर्जाची सुरक्षा

असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबारानंतर ओवेसींना केंद्राकडून झेड दर्जाची सुरक्षा
Published on
Updated on

नवी दिल्ली पुढारी वृत्तसेवा : ऑल इंडीया मजलिस-इत्तेहादुल-ए मुसलमीन पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर काल  गोळीबार झाला. या घटनेनंतर केंद्र सरकारकडून खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. ओवेसींना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील मेरठहून दिल्लीकडे परतत असताना हापूडजवळ ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत कोणीही जखमी झाले नव्हते. गृह मंत्रालयाने ओवेसी यांच्या सुरक्षेचा आढावा घेत त्यांना तात्काळ झेड दर्जाची सुरक्षा दिली आहे. (असदुद्दीन ओवेसी)

ओवेसी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केलेल्या दोन आरोपींकडून उत्तर प्रदेश पोलिसांनी दोन देशी पिस्तूल ताब्यात घेतले आहेत. सचिन नावाच्या आरोपीने हे पिस्तूल खरेदी केले होते. ओवेसी यांच्या मेरठमध्ये झालेल्या सभेतही हे दोन्ही आरोपी हजर होते व गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मागावर होते. गोळीबार केल्यानंतर पोलिसांना शरण जाण्याची आरोपींची योजना होती, मात्र ओवेसी यांच्या गाडीच्या चालकाने गाडी भरधाव नेल्याने आरोपींची योजना फसली होती, असा पोलिसांचा दावा आहे. ओवेसी आणि त्यांचा बंधू अकबरुद्दीन यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे आरोपी नाराज होते. दोन्ही ओवेसी बंधू हिंदुंच्या धार्मिक आस्थांशी खेळत असल्याचे आरोपींना वाटत होते. वैचारिकदृष्ट्या दोन्ही आरोपी कट्टर होते, त्यातून त्यांनी हल्ल्याची योजना आखली होती, असेही पोलिसांचे म्हणणे आहे. (असदुद्दीन ओवेसी)

हेही वाचलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news