…………..आणि म्हणून इंग्लिश -विंग्लिशच्या शूटिंग दरम्यान श्रीदेवीने रडत -रडत केला होता जान्हवीला फोन

…………..आणि म्हणून इंग्लिश -विंग्लिशच्या शूटिंग दरम्यान श्रीदेवीने रडत -रडत केला होता जान्हवीला फोन
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'क्वीन ऑफ एक्स्प्रेशन्स' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवीचा अपघाती मृत्यू झाला आणि सगळ्यांनाच धक्का बसला. करिअरची दुसरी इनिंग अत्यंत यशस्वीपणे सुरु असताना तिच्या अचानक जाण्याने प्रत्येकजण हळहळला. अभिनेत्री म्हणून असलेल्या श्रीदेवीच्या गुणांबाबत तिचे फॅन्स परिचित आहेतच. पण बोनी कपूर यांच्याशी लग्न झाल्यानंतर, जान्हवी आणि खुशीची आई म्हणून तिची कुटुंबवत्सल बाजू फारशी उजेडात आली नाही. जान्हवी अनेकदा इंटरव्ह्यूमधून श्रीदेवीच्या अनेक आठवणींना उजाळा देत असते.

आताही तिने असाच एक किस्सा शेअर केला आहे. मुलींच्या जन्मानंतर श्रीदेवीने अभिनयातून बराच काळ ब्रेक घेतला होता. त्यानंतर गौरी शिंदेच्या 'इंग्लिश विंग्लिश' मधून तिने पुन्हा अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. या दरम्यान शूटिंगसाठी तिला बराच काळ घरापासून आणि मुलींपासून लांब रहावं लागलं. अशातच तिची धाकटी लेक खुशीचा वाढदिवस होता. कामाच्या घाईत ती तो विसरून गेली होती. पण दुसऱ्या दिवशी तिने जान्हवीला फोन केला आणि फोनवर रडू लागली.

'मला आता अभिनयात करिअर करायचे नाही. मला फक्त मुलींसोबत राहायचं असल्याचं तिने रडत रडत खुशी आणि जान्हवीला सांगितलं. त्यावेळी जान्हवीने तिला करिअर पुढे चालू ठेवण्यासाठी प्रोत्साहित केलं. जान्हवी म्हणते, ' कदाचित त्यावेळी आम्ही तिच्या भावना फारशा नीट समजू शकलो नव्हतो. पण आता अनेकदा त्याचा अर्थ समजून येतो'. जान्हवीने सैराट चा हिंदी रिमेक असलेल्या सैराटमधून बॉलिवूड पदार्पण केलं. तर श्रीदेवीची धाकटी लेक ख़ुशी झोया अख्तरच्या आर्चिसमधून सिनेमात पदार्पण करते आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news