कार चालवल्यानंतर आता साौदीच्या महिला जाणार अंतराळातही!

कार चालवल्यानंतर आता साौदीच्या महिला जाणार अंतराळातही!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : सौदी अरेबियामध्ये गेली अनेक वर्षे महिलांना कार चालवण्यावर बंदी होती. महिलांनी कार चालवण्यावर कडक प्रतिबंध होते. मात्र, सौदी अरेबियामध्ये चार वर्षांपूर्वी कायद्यात एक मोठा बदल करण्यात आला आणि महिलांना कार चालवण्याचा हक्क मिळाला. कार चालवल्यानंतर आता सौदीच्या महिलांना अंतराळात जाण्याची संधी देखिल मिळणार आहे.

सौदी अरेबियाने आपला अंतराळवीर कार्यक्रम सुरू केला आहे, ज्यामध्ये देशातील पहिली महिला अंतराळात जाणार आहे. सौदीच्या किंग्डमने गुरुवारी आपला अंतराळ कार्यक्रम जाहीर केला. ज्यामध्ये सक्षम कर्मचा-यांना दीर्घ आणि अल्प मुदतीच्या अंतराळ उड्डाणांसाठी प्रशिक्षित करणे हा आहे. ज्यामध्ये पुरुषासोबत महिलांनाही संधी मिळणार आहे. सौदीचा हा अंतराळ कार्यक्रम महत्वाकांक्षी व्हिजन 2030 चा एक भाग असणार आहे.

व्हिजन 2030 च्या अंतराळ कार्यक्रमांतर्गत सौदीने ह्यूस्टनच्या Axiom Space सोबत खाजगीरित्या करार केला आहे. ह्यूस्टनची ही संस्था संशोधक आणि पर्यटकांसाठी यूएस अंतराळ यानावर अवकाशात खाजगी मोहिमेची व्यवस्था आणि व्यवस्थापन करतो. या करारांतर्गत, दोन सौदी अंतराळवीर पुढील वर्षाच्या सुरुवातीस SpaceX च्या क्रू ड्रॅगन कॅप्सूलमधून सुमारे आठवडाभराच्या मुक्कामासाठी स्पेस स्टेशनवर जातील, असे सूत्रांनी सांगितले. खाजगी अंतराळयानातून अंतराळात जाणारे सौदी हे त्यांच्या देशातून पहिले असतील. या अंतराळ कार्यक्रमात पुरुष अंतराळवीरासह महिला अंतराळवीर देखिल असणार आहे.

महिलेचे अंतराळ मिशन सौदीसाठी ऐतिहासिक ठरेल

सौदी स्पेस कमिशनने एका निवेदनात म्हटले आहे की, "कार्यक्रम सौदी अंतराळवीरांना आरोग्य, टिकाव आणि अंतराळ तंत्रज्ञान यासारख्या प्राधान्य क्षेत्रांमध्ये मानवतेच्या भल्यासाठी वैज्ञानिक प्रयोग आणि संशोधन करण्यास सक्षम करेल."

त्यात जोडले आहे की अंतराळवीर कार्यक्रम हा व्हिजन 2030 चा अविभाज्य भाग आहे आणि "सौदी अंतराळवीरांना मानवतेची अधिक चांगल्या प्रकारे सेवा करण्यासाठी अंतराळात पाठवेल. अंतराळवीरांपैकी एक सौदी महिला असेल, जिचे अंतराळातील मिशन राज्यासाठी ऐतिहासिक प्रथम प्रतिनिधित्व करेल."

हे ही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news