जाणून घ्या, कोण आहे ही सौदीची महिला ज्यांचे कौतुक करताना भारतीय थकत नाहीत | पुढारी

जाणून घ्या, कोण आहे ही सौदीची महिला ज्यांचे कौतुक करताना भारतीय थकत नाहीत

पुढारी ऑनलाईन: सौदी अरेबिया या इस्लामिक देशात योग कसा लोकप्रिय झाला हे तुम्हाला माहीत आहे का? तिथल्या लोकांना योग करण्याची प्रेरणा कशामुळे मिळाली? तर त्यांचे नाव आहे नौफ मारवाई. होय, सौदी अरेबिया या इस्लामिक देशात योग लोकप्रिय करणाऱ्या नौफ मारवाई आहेत, ज्या अनेकदा चर्चेत असते. यावेळी रक्षाबंधनाच्या खास प्रसंगी भारतीय सोशल मीडियावर लोकांनी त्यांना बहीण मानत या सणासाठी शुभेच्छा दिल्या. बर्‍याच भारतीय वापरकर्त्यांनी मारवाई यांचे जोरदार कौतुक केले आहे आणि त्यांचे वर्णन लोकांसाठी ती प्रेरणास्थान आहे असे केले. नौफ मारवाई या सौदी अरेबियाच्या नागरिक आहेत आणि त्या देशातील पहिल्या सर्टिफाईड योग प्रशिक्षक आहेत.

सौदीमध्ये योगाला ओळख मिळवून दिल्याबद्दल त्यांना 2018 मध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून पद्मश्री हा भारताचा चौथा सर्वोच्च सन्मानही मिळाला आहे. अरबमध्ये योगास कायदेशीर मान्यता मिळणे नौफसाठी खूप कठीण होते. यासाठीही त्यांना सौदी अरेबियातील कट्टरवाद्यांचा विरोध सहन करावा लागला होता. अशा सर्व आव्हानांना तोंड देत सौदी अरेबियामधील घराघरात योगा नेण्यात नौफ यशस्वी ठरल्या.

सोशल मीडियावर लोकांनी नौफ यांना रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा दिल्या आणि त्यांनीही सर्वांना उत्तरही दिले. एका भारतीय यूजरने लिहिले की, “नौफचे आयुष्य आणि तिचे योगिनी बनणे खूप प्रेरणादायी आहे, हा एक चमत्कार आहे.” आणखी एका भारतीय वापरकर्त्याने ट्विट केले की, “अरब जग आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक देवाणघेवाण बऱ्याच काळापासून सुरू आहे आणि नौफ मारवाई हा वारसा यशस्वीपणे पुढे नेत आहे.” भारताकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा.

UAE मधील स्थानिक रहिवासी आणि सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या हसन सजवानी यांनी ट्विट केले की, “भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून पद्मश्री पुरस्कार प्राप्त सौदी महिलेला भेटा. नौफ या सौदी अरेबियाच्या पहिल्या सर्टिफाईड योग प्रशिक्षक आहेत. सौदी अरेबियामध्ये योगाला कायदेशीर मान्यता मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सौदी अरेबियामध्ये भारताचे राजदूत असलेले नवदीप सूरी यांनी नौफचे कौतुक केले आणि सांगितले की, मला 2019 मध्ये अबू धाबी येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नौफ मारवाई यांना भेटण्याची संधी मिळाली. त्या तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे.


एका अहवालानुसार, दोन दशकांपूर्वीपर्यंत सौदी अरेबियामध्ये नौफ या एकमेव योगा शिक्षक होत्या. 2004 मध्ये त्या पहिल्यांदा योगाबद्दल जाहीरपणे बोलल्या. तसेच हजारो लोकांना आणि अनेक योगा शिक्षकांना प्रशिक्षण दिले. नौफ यांनी 2006 मध्ये योगास कायदेशीर करण्यासाठी प्रशासनाकडे संपर्क साधला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.

2015 पासून बदलाला सुरुवात झाली, असे त्या सांगतात. मात्र, त्यावेळी काही अतिरेकी महिलांनी योगा करण्याच्या विरोधात होते. त्याचवेळी संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला. एवढेच नाही तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नौफवर खूप प्रभाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांचे परराष्ट्र धोरण अतिशय प्रभावी असल्याचे त्या सांगतात. योग दिनाची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हावी यासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे मला त्यांच्याबद्दल माहिती मिळाली.

Back to top button