‘दृश्यम-२’ नंतर रॉकस्टार डीएसपी-अजय देवगण पुन्हा एकत्र

ajay devgan
ajay devgan

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीत सेन्सेशन रॉकस्टार डीएसपी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाले आहेत. पुनरागमन करण्याच्या तयारीत असताना भारतीय चित्रपटसृष्टीत नवा उत्साह निर्माण झाला आहे. अजय देवगण, आर. माधवन आणि ज्योतिका या त्रिकूटाने अभिनीत तो नवा प्रोजेक्ट करणार आहे. विशेषतः रॉकस्टार डीएसपी आणि अजय देवगण यांनी 'दृश्यम 2' मध्ये एकत्र काम केल्यानंतर आता नवीन काय असणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे. रॉकस्टार डीएसपी त्याच्या भावनिक सुरांसाठी प्रसिद्ध आहे. दृष्यम 2 मध्‍ये अजय देवगणसोबतच त्याचे काम हिट ठरले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news