PAK vs AFG : पराभवानंतर अफगाणिस्तान चाहत्यांचा राडा, PAK चाहत्यांना खुर्च्या फेकून मारहाण, Video व्हायरल

PAK vs AFG : पराभवानंतर अफगाणिस्तान चाहत्यांचा राडा, PAK चाहत्यांना खुर्च्या फेकून मारहाण, Video व्हायरल
Published on
Updated on

शारजाह : शादाब खान (36), इफ्तिकार अहमद (35), मोहम्मद रिझवान (20) यांच्या उपयुक्‍त फलंदाजीच्या बळावर पाकने (PAK vs AFG) शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात अफगाणिस्तानवर एक विकेटने निसटती मात केली. या विजयाबरोबरच पाकने आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर-4 मध्ये सलग दुसरा विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. जेतेपदासाठी पाकची गाठ आता श्रीलंकेबरोबर पडणार आहे. तर भारताची अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा मावळल्या आहेत. तर अफगाणिस्तानचे आव्हानही संपुष्टात आले. या पराभवानंतर अफगाणिस्तानचे चाहते संतप्त झाले. त्यांनी पाकिस्तानी चाहत्यांना मारहाण केली. याचा एक व्हिडिओ शोएब अख्तरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात अफगाणिस्तानचे चाहते स्टेडिअममध्ये खुर्च्या फेकून मारताना दिसत आहेत. (Asia Cup 2022)

अख्तरने शेअर केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, 'अफगाणचे चाहते हेच करत आले आहेत. त्यांनी या आधी अनेकवेळा हेच केले आहे. हा एक खेळ आहे आणि तो योग्य भावनेने खेळला जावा आणि घेतला जावा.' त्याने हा व्हिडिओ @ShafiqStanikzai यांना टॅग करत, जर तुम्हाला खेळात प्रगती करायची असेल तर तुमच्या चाहत्यांची गर्दी आणि तुमचे खेळाडू या दोघांना काही गोष्टी शिकण्याची गरज असल्याचा सल्ला दिला आहे. अख्तरने ज्यांना हा व्हिडिओ टॅग केला आहे ते
शफीक स्टानिकजई हे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डचे माजी मुख्य कार्यकारी अध्यक्ष आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

130 चे टार्गेट असताना पाकने (PAK vs AFG) 19.2 षटकांत 9 बाद 131 धावा काढल्या. पाकचा कर्णधार बाबर आझमला पहिल्याच षटकात (0) फारूकीने पायचित केले. तर फखर जमन (5) धावबाद झाला. तर राशिदने रिझवानला (20) पायचित केले. यामुळे पाकची 3 बाद 45 अशी स्थिती झाली. मात्र, त्यानंतर इफ्तिकार अहमदने (30) शादाबसोबत चौथ्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी करून संघाला सावरले. 16 व्या षटकाअखेर पाकची 4 बाद 91 अशी स्थिती होती. मात्र, शादाब (36), मोहम्मद नवाझ (4) हे झटपट बाद झाल्याने पाकची 6 बाद 106 अशी स्थिती झाली. पाठोपाठ खुशदील शहा (1) त्रिफळाबाद झाला. शेवटच्या 12 षटकांत पाकला 21 चेंडूंची गरज होती. याचवी राऊफ शून्यावर तर असिफ अली 16 धावांवर बाद झाला. मात्र, नसिम शहाने सलग दोन षटकार खेचून पाकला विजय मिळवून दिला. अफगाणिस्तानच्या फझलहक फारूकी 31 धावांत 3, फरीद अहमदर 31 धावांत 3 तर राशिद खान 25 धावांत 2 विकेट घेतल्या.

तत्पूर्वी, अफगाणिस्तानने 20 षटकात 6 बाद 129 धावा काढल्या होत्या. त्यांच्या इब्राहिम जादरानने सर्वाधिक 35 धावा काढल्या. हा सामना जिंकण्यासाठी अफगाणिस्तानने शेवटपर्यंत संघर्ष केला. पण या सामन्यात पाकिस्तानने निसटता विजय मिळवला. (Asia Cup 2022)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news