Google Jobs : व्वा रे पठ्ठ्या! Google नं ३९ वेळा रिजेक्ट केलं अन् ४० व्या प्रयत्नात दिली युवकाला नोकरी

google
google

पुढारी ऑनलाईन : टायलर कोहेन या युवकाने ३९ वेळा Google कडे नोकरीसाठी न थकता अर्ज केला, पण त्याला यामध्ये अपयश आले. अखेर त्याला ४० व्या प्रयत्नात Google ने त्याचा अर्ज स्वीकारत नोकरी दिली आहे. या नोकरी मिळविण्याच्या स्पर्धेत अमेरिकन युवकाने हार न मानता जिद्द आणि चिकीटीने प्रयत्न केले. Google या कंपनीतच नोकरी मिळविण्याच्या हट्टाने त्याने त्याचे प्रयत्नच सुरूच ठेवले आणि त्याच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. त्याच्या या जिद्दी स्वभावाचे जगभर कौतुक होत आहे.

टायलर या युवकाने ठरवले होते की, नोकरी केली तर फक्त Google या कंपनीमध्येच करेन. यासाठी तो काहीही करायला तयार होता. यासाठी त्याने एक दोनवेळा नाही तर तब्बल ३९ वेळा नोकरीसाठी गुगलकडे नोकरीसाठी अर्ज केला, मात्र तो वारंवार रिजेक्ट करण्यात आला. हार न मानता त्याने त्याचे प्रयत्न सुरूच ठेवले, अखेर ४० व्या प्रयत्नात त्याला Google ने सिलेक्ट केले. यादरम्यान वारंवार केलेल्या अर्जाचे त्याने स्क्रिनशॉट काढत सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, हा युवक २०१९ पासून Google मध्ये नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करत होता.

आतापर्यंत या युवकाने नोकरीसाठी जवळपास ४० वेळा अर्ज Google कडे पाठवले होते, पण यातील ३९ वेळा त्याच्या पदरी निराशाच पडली. पण त्याने खचून न जाता त्याचे प्रयत्न सातत्यपूर्वक सुरूच ठेवले. ११ मे २०२० ला त्याने ३९ वा अर्ज केला. तेव्हा तो रिजेक्ट झाला. त्यानंतर त्याने ११ जुलैला पुन्हा अर्ज केला, यावेळी मात्र त्याचे नशिब जोरात होते. Google ने त्याचा अर्ज स्वीकारत त्याला आपल्या कंपनीत नोकरी दिली. या युवकाच्या जिद्दीची जगभर चर्चा होत आहे. त्याने शेअर केलेल्या या घटनेवर नेटकरीसुद्धा भरभरून प्रतिक्रिया देत असून, त्याच्या जिद्द आणि चिकाटीचे कौतुक करत आहेत. यावर फक्त नेटकऱ्यांनीच नाही, तर चक्क गुगलने देखील त्याला प्रतिसाद दिला आहे.  'तुझे आपल्या कुटुंबात स्वागत आहे'. "काय प्रवास झाला?, टायलर! ही नक्कीच वेळ होती," असे Google ने दिलेल्या प्रतिसादात या युवकाला म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news