Gangster Chhota Rajan: अंडरवर्ल्ड डॉन ‘छोटा राजन’चा ९ वर्षाच्या अटकेनंतर पहिल्यांदाच फोटो आला समोर

Gangster Chhota Rajan
Gangster Chhota Rajan

पुढारी ऑनलाईन डेस्क: तिहार तुरुंगात असलेला छोटा राजनची तुरुंगातील फोटो समोर आला आहे. ९ वर्षापूर्वी बाली येथील विमानतळावर अटक केल्यानंतर पहिल्यांच छोटा राजनचा फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये तो निरोगी आणि तंदुरुस्त दिसत असल्याचे वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे. (Gangster Chhota Rajan)

राजन सध्या तिहार तुरुंगातील तुरुंग क्रमांक 2 मधील उच्च सुरक्षा कक्षात बंद आहे. त्याचा हा फोटो कोविड दरम्यान किंवा आजारपणाच्या काळात त्याचा मृत्यू झाल्याच्या अफवा दूर करते. दरम्यान त्याच्यावर तुरुंगात हल्ला होण्याची भीती देखील पुन्हा जागृत केली आहे, ज्यामुळे गुप्तचर यंत्रणा घाबरल्या आहेत, असे देखील वृत्तात म्हटले आहे. (Gangster Chhota Rajan)

छोटा राजनवर भारतात अनेक गुन्हे दाखल आहेत. तो मुंबई पोलिसांना मोस्ट वॉण्टेड होता आणि त्यामुळे तो कधीच इथे आला नव्हता. 2015 मध्ये त्याला बाली, इंडोनेशिया येथून अटक करून नंतर भारतात आणण्यात आले. तेव्हापासून तो दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे. छोटा राजनच्या जीवाला धोका होऊ नये, यासाठी त्याला तिहारमधील सर्वोच्च सुरक्षा तुरुंग क्रमांक 2 मध्ये ठेवण्यात आले आहे.

Gangster Chhota Rajan: कोण आहे छोटा राजन?

छोटा राजन हा दाऊद इब्राहिमचा शत्रू नंबर वन मानला जातो. दाऊदच्या बाजूने अनेकवेळा त्याच्यावर प्राणघातक हल्ले झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, दाऊद आणि छोटा राजन हे सुरुवातीपासूनच शत्रू नव्हते. दाऊदबद्दल असे म्हटले जाते की, अंडरवर्ल्डमध्ये त्याच्या नावावर गुन्हेगारी उद्योग चालत असे. छोटा राजन हा त्यावेळी दाऊदचा उजवा हात मानला जात होता. मात्र, नंतर त्यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाल्याच्या काही घटना घडल्या. हळूहळू दाऊद टोळी छोटा राजनची शत्रू बनली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news