मनपा शाळांत ‘अ‍ॅडमिशन फुल्ल’

मनपा शाळांत ‘अ‍ॅडमिशन फुल्ल’
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : खासगी शाळांच्या जमान्यात महापालिकेच्या शाळांनीही गुणवत्ता टिकवून ठेवली आहे. पदरमोड करून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी शाळेचा नावलौकिक वाढवत आहेत. खासगी शाळांइतकेच दर्जेदार शिक्षण या शाळांतूनही दिले जात आहे. परिणामी, महापालिकेच्या शाळांच्या बाहेरही अ‍ॅडमिशन फुल्ल असे बोर्ड लागत आहेत. खासगी शाळांच्या तुलनेत महापालिकेच्या शाळाही कमी नसल्याचेच यावरून सिद्ध होते.

महापालिकेच्या काही शाळांचा शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून राज्यात दबदबा आहे. राज्यात सर्वाधिक विद्यार्थी आणि राज्यात पहिला, दुसरा, तिसरा क्रमांकही महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा येत आहे. साहजिकच त्यामागे शिक्षकांची प्रचंड मेहनत आहे. ई-लर्निंगसह इतर बहुतांश सेवाही या शाळांतून उपलब्ध आहेत. त्याचमुळे या शाळातील विद्यार्थी यशाची शिखरे पादाक्रांत करत आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे 1942 ला महापालिका स्कूल बोर्ड म्हणजेच शिक्षण मंडळाची स्थापना झाली. वर्षागणिक या शाळांचा नावलौकीक वाढतच आहे. महाराष्ट्रात कोल्हापूर महापालिका एकमेव आहे की विद्यार्थ्यांना स्वनिधीतून शिष्यवृत्ती देत आहे. विद्यार्थ्यांना मोफत केएमटी बससेवा दिली जाते.

* अ‍ॅडमिशन फुल्ल बोर्ड लागणार्‍या शाळा…
* लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यालय, जरगनगर
* प्रिन्स शिवाजी विद्यालय, जाधववाडी
* नेहरूनगर विद्यालय, नेहरूनगर
* टेंबलाईवाडी विद्यालय, टेंबलाईवाडी
* वीर कक्कय्या विद्यालय, जवाहरनगर
* प्रिन्स शिवाजी विद्यालय, कसबा बावडा
* यशवंतराव चव्हाण विद्यालय,
लक्षतीर्थ वसाहत
*  महात्मा फुले विद्यालय, फुलेवाडी
* शाबाजखान आमीनखान जमादार उर्दू-मराठी
स्कूल, जवाहरनगर

कोल्हापूर शहरातील महापालिकेच्या शाळा…

* एकूण शाळा – 58
* सेमी इंग्रजी शाळा – 11
* उर्दू-मराठी शाळा – 05
* विद्यार्थी संख्या – 10,713
* विद्यार्थी – 4999
* विद्यार्थिनी – 5714

सर्व शाळांत ई-लर्निंग
* शिक्षक – 346
* शिक्षकेतर स्टाफ – 94
* स्कूल बोर्ड स्टाफ – 08
* शाळांच्या इमारती – 56
* मैदाने – 56

* विद्यार्थ्यांना मोफत केएमटी पास
* सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश
* राजर्षी शाहू शिष्यवृत्ती योजना
* एकूण वेतन – 3,45,31,356 रु.
* मनपा हिस्सा – 2,10,54,501 रु.
* शासन हिस्सा – 1,34,76,855 रु.
* पेन्शन – 1,35,41,242 रु.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news