शिवेसना नाव-चिन्ह गोठवण्याचा नीच प्रकार खोकेवाल्या गद्दारांमुळेच : आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : निवडणूक आयोगाने शिवसेनेचे 'धनुष्यबाण' हे चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात गोठविण्यात आल्याचा निर्णय दिला आहे. तसेच शिवसेनेच्या दोन्ही गटांना या चिन्हा वापर करता येणार नाही असे म्हटले आहे. शिवाय दोन्ही गटांना शिवसेना हे नाव देखील वापरता येणार नाही असा निर्णय दिला आहे. यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाना साधला आहे.

खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवेसना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. लढणार आणि जिंकणारच, आम्ही सत्याच्या बाजूने आहोत, असे शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार दोन्ही गटाला शिवसेना ऐवजी वेगळे नाव आणि वेगळे चिन्ह घ्यावे लागले. आगामी येऊ घातलेली विधानसभेची अंधेरी मतदारसंघातील पोटनिवडणुकीत आणि मुंबईच्या महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या दोन्ही गटाला आपले धनुष्यबाण वापरता येणार नाही. तसेच शिवसेना हे नाव सुद्धा वापरता येणार नाही.

निवडणूक आयोग जेव्हा अंतिम निर्णय घेईल तेव्हा कोणत्यातरी एका गटाला एखाद्यावेळेस मूळ 'शिवसेना' हे नाव आणि त्याचे 'धनुष्यबाण' चिन्ह पुन्हा मिळू शकते. मात्र हे सर्व निवडणूक आयोगाकडे दोन्ही गटाचे सर्व म्हणणे व कागदपत्रे तपासल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जावू शकतो.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news