Ananya Pandey Breakup : २ वर्षाच्या डेटिंगनंतर अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूरचा ब्रेकअप?

Ananya Pandey-aditya roy kapur
Ananya Pandey-aditya roy kapur

पुढारी ऑनलाईन डेस्क : दोन वर्षाच्या डेटिंगनंतर अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूर यांचा ब्रेकअप झाला. (Ananya Pandey Breakup) रिपोर्ट्सनुसार, त्यांचा १ महिना आधी ब्रेकअप झाला आहेय पण दोघे कोणत्या कारणाने वेगळे झाले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. दोन्ही कलाकारांनी ही माहिती सार्वजनिक केलेली नाही. (Ananya Pandey Breakup)

या कपलने मार्च महिन्यात ब्रेकअप केलं होतं. ते एकमेकांप्रती गंभीर आहेत. पण आम्हाला अचानक धक्का बसला, असे आदित्य-अनन्याच्या जवळच्या मित्राने सांगितले असल्याचे सूत्रांकडून समजते.

आदित्यशी ब्रेकअप झाल्यानंतर अनन्या खूप दु:खी आहे. पण ती पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. ती आपल्या नव्या मित्रासोबत वेळ घालवत आहे. आदित्यदेखील मूव्ह ऑन करण्याचा प्रयत्न करत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनन्या पांडे – आदित्य रॉय कपूर दोन वर्ष रिलेशनशीपमध्ये होते. दोघे अनेकदा सोबत स्पॉट झाले आहेत. अखेरीस हे कपल मार्चमध्ये मुकेश अंबानींचा लहान मुलगा अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये दिसले होते.

अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरने एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो देखील केलं आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news