आदिती तटकरे रायगडच्या पालकमंत्रिपदी नकोच; रायगडमधील सहा आमदारांचे विरोधाचे निशाण

आदिती तटकरे रायगडच्या पालकमंत्रिपदी नकोच; रायगडमधील सहा आमदारांचे विरोधाचे निशाण

रायगड; पुढारी वृत्तसेवा :  रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी आदिती तटकरे नकोत, यासाठी शिवसेनेच्या तीन आमदारांबरोबर भाजप आमदारांनीही आता या वादात उडी घेतली आहे. रायगड जिल्ह्यात भाजपचे तीन, तर शिंदे गटाचे तीन आमदार आहेत. दरम्यान, या सहा आमदारांंनी विद्यमान पालकमंत्री उदय सामंत यांनाच पसंती दिली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात आदिती तटकरे या रायगडच्या पालकमंत्री होत्या. त्यावेळी त्याच्या पालकमंत्रिपदाचा शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी विरोध करत बंडाचे निशाण रोवले होते. यामध्ये भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे यांचा समावेश होता. गोगावलेंना मंत्रिपद मिळेल, अशी पूर्ण खात्री होती. मात्र त्यांची झोळी रिकामीच राहिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news