Adani stocks | अदानींना आणखी ५० हजार कोटींचा फटका! आठव्या सत्रातही शेअर्स १० टक्क्यांपर्यंत घसरले

Adani stocks | अदानींना आणखी ५० हजार कोटींचा फटका! आठव्या सत्रातही शेअर्स १० टक्क्यांपर्यंत घसरले
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये (Adani stocks) होत असलेली घसरण थांबता थांबेना झाली आहे. आज सोमवारी (दि.६)अदानी समूहातील शेअर्स १० टक्क्यांपर्यंत घसरले. तर १० पैकी ६ शेअर्स हे लोअर सर्किट लिमिटमध्ये गेले आहे. आजच्या व्यवहारात अदानी समूहातील १० शेअर्सच्या बाजार भांडवलास बसलेला फटका हा ५० हजार कोटींहून अधिक आहे. तर गेल्या ८ सत्रातील त्यांचे एकूण नुकसान सुमारे १० लाख कोटी एवढे आहे. याबाबतचे वृत्त द इकॉनॉमिक टाइम्सने दिले आहे.

आजच्या व्यवहारात अदानी ट्रान्समिशनमध्ये सर्वाधिक १० टक्क्यांची घसरण दिसून आली. हा शेअर आता १,२६१ रुपयांवर आला आहे. अदानी एंटरप्रायजेसचा शेअर आणखी ७.५ टक्क्यांनी घसरून १,४६५ रुपयांपर्यंत खाली आला. अदानी ग्रीन एनर्जी (-५ टक्के), अदानी पॉवर (-५ टक्के), अदानी टोटल गॅस (-५ टक्के), अदानी विल्मर (-५ टक्के) आणि एनडीटीव्ही (-४.९८ टक्के) हा शेअरदेखील ५ टक्क्यांच्या लोअर सर्किटमध्ये अडकला आहे.

हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळत आहेत. नुकताच अदानी एंटरप्रायझेसने त्यांचा २० हजार कोटी रुपयांचा एफपीओ (फॉलोऑन पब्लिक ऑफर) मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. अदानी समूह (Adani Group) गेल्या अनेक वर्षापासून स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंट फ्रॉड करत असल्याचा दावा अमेरिकेतील शॉर्ट- सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने त्यांच्या अहवालातून केला होता. या अहवालानंतर शेअर बाजारात हाहाकार उडाला आहे. (Adani stocks)

दरम्यान, बाजारात सध्या अस्थिरता आहे. बाजार स्थिर झाल्यावर आम्ही आमच्या भांडवली बाजार धोरणाचा आढावा घेऊ. आम्ही ईएसजीवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे आणि आम्ही आमच्या प्रत्येक व्यवसायातून योग्य मार्गाने महसूल निर्माण करत राहू. आमचा ताळेबंद (balance sheet) मजबूत आहे. आमची EBIDTA पातळी आणि पैशाचा ओघ खूप मजबूत आहे, असा दावा अदानींनी केला आहे.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news