Adani Group Stock : निफ्टीवर अदानी कंपन्यांचे शेअर्स ठरले ‘रॉकस्टार’; 15 टक्क्यांची वाढ

Adani Group Stock
Adani Group Stock

पुढारी ऑनलाइन डेस्क : भारतीय शेअर बाजारात आज निफ्टीला अदानी कंपन्यांच्या शेअर्सनी मोठा आधार दिला. अदानी कंपन्यांच्या शेअर्समुळे निफ्टी 50 वर 18300 वर ढकलले. अदानी एंटरप्रायजेस आणि अदानी पोर्ट्स यांचे समभाग निफ्टीवर तब्बल 15 टक्क्यापर्यंत वाढले असून शेअर बाजार बंद होईपर्यंत 17 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. त्यामुळे सपाट सुरुवात झालेल्या आजच्या भारतीय बाजारात अदानी समूहाचे शेअर्स 'रॉकस्टार' ठरलेत, असे म्हणता येऊ शकते.

Adani Group Stock : अदानी समूहातील कोणत्या कंपन्यांचे शेअर्स किती वाढले

अदानी एंटरप्रायझेसच्या समभागांची किंमत आज 15% वाढून 2244.85 रुपयांवर पोहोचली आहे. अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनचे शेअर्स जवळपास 10% वाढून रु. 752.55 वर, अदानी पॉवरचे शेअर्स 5% वाढून रु. 248 वर, अदानी ट्रान्समिशनचे शेअर्स 5% वाढून रु. 825.35 वर, अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 5% वाढून रु. 942.4 वर, अदानी एकूण Ga चे शेअर्स 5% वाढले. 5% वाढून रु. 721.35 वर, अदानी विल्मरचे शेअर्स 10% वाढून रु. 444.4 वर, NDTV चे शेअर्स 5% वाढून रु. 186.45 वर पोहोचले आहेत.

Adani Group Stock : सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर शुक्रवारपासूनच शेअर्स वधारण्यास सुरुवात

अदानी-हिंडनबर्ग प्रकरणात नियामक व्यवस्था फोल ठरल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने गठित केलेल्या न्या. सप्रे समितीने काढला आहे. अदानी-हिंडनबर्ग प्रकरणाचा तपास करण्यासाठी न्यायालयाने नेमलेल्या विशेषतज्ज्ञ समितीचा अहवाल शुक्रवारी सार्वजनिक करण्यात आला. या अहवालानंतर अदानी समुहाला मोठा दिलासा मिळाला आहे. अदानी समुहाने कुठलीही आर्थिक माहिती लपवली नसल्याचे न्यायालयात सादर करण्यात आलेल्या १७३ पानी अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, सर्वोच्य न्यायालयाच्या तज्ज्ञ समितीकडून दिलासा मिळाल्यानंतर अदानी समूहाचे शेअर्स (Adani Group stocks) दुपारच्या सत्रात सुमारे ४ टक्क्यांपर्यंत वधारले. बीएसईवर अदानी एंटरप्रायजेसचा (adani enterprises share price) शेअर ३.९२ टक्के वाढून १,९६२ रुपयांवर पोहोचला. याआधी हा शेअर १,८८८ रुपयांवर बंद झाला होता. मात्र, यंदा हा शेअर ४९ टक्क्यांनी खाली आला आहे. एका वर्षात अदानी एंटरप्रायजेसचा शेअर ७.४१ टक्क्यांनी घसरला आहे. दुपारच्या ट्रेडिंग सत्रात अदानी एंटरप्रायजेसचे बाजार भांडवल २.२२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. त्यांच्या एकूण २.२४ लाख शेअर्सनी बीएसईवर ४२.७८ कोटी रुपयांचा व्यवहार केला.

Adani Group Stock : आज सोमवारी अदानी शेअर्सने घेतली गगनभरारी

अदानी समूहाला दिलासा मिळाल्यानंतर शुक्रवारपासूनच कंपन्यांचे शेअर्स वधारण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आज अदानी कंपन्यांचे शेअर्स तब्बल 17 टक्क्यांपर्यंत वाढले. इतकेच नव्हे तर अदानी कंपन्यांच्या शेअर्समुळे निफ्टी आज 50 अंकांच्या वर 18300 वर राहिला.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news