पुढारी ऑनलाईन डेस्क : 'द केरल स्टोरी' अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) ची तब्येत काही दिवसांपासून खराब आहे. फूड ॲलर्जी आणि डायरियामुळे तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करावे लागले होते. आता तिने स्वत : सांगितलं आहे की, तिला आरोग्याच्या तक्रारी सुरु आहेत. त्यामुळे तिने आता मोठा निर्णय घेतला आहे. (Adah Sharma) सोशल मीडियावर तिने काही फोटोज शेअर केले आहेत. याची झलक तिने शेअर केलीय. सध्या अदा 'कमांडो-२' मुळे चर्चेत असून प्रमोशन करत आहे. तिने सांगितले की, आता आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
अदाने तिला झालेल्या ॲलर्जीचे काही फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. याचसोबत तिने एक मोठी पोस्ट लिहिलीय. अदाने लिहिलं, 'धन्यवाद सर्वांना. कुठून कुठून मला मेसेज मिळत आहेत. ज्या लोकांना इतके वर्ष भेटले नाही, आणि फॅन्स क्लब्सचे आभार.