Marathi Tv Serial : अप्पी आणि उमाची उत्साहात नवरात्री उत्सव

Marathi Tv Serial
Marathi Tv Serial

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशभरात नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. झी मराठीवरील मालिकांमध्ये ( Marathi Tv Serial ) प्रमुख भूमिका निभावणाऱ्या अभिनेत्री शिवानी नाईक आणि अभिनेत्री खुशबू तावडे यांनी नवरात्रोत्सवाबाबत आपआपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

संबधित बातम्या

'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत अप्पीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी नाईक म्हणाली की, 'नवरात्री हा माझ्यासाठी खूप महत्वाचा सण आहे, कारण या नऊ दिवसात प्रसन्न आणि छान वातावरण असते. देवीमधला शांतता, आत्माविश्वास, तिच्या डोळ्यातील तेज सर्वांची मने प्रसन्न करत असते. देवीची नऊ रूपं आपल्यावर कुठल्या न कुठल्या प्रकारे प्रभाव पाडतात. या वर्षी मी शूट करत असेन पण मी नक्की देवीचे दर्शन व आशिर्वाद घेईन आणि तिचे मनापासून आभार मानेन. सगळ्या प्रेक्षकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.'

'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेतून उमाची भूमिका साकारणारी अभिनेत्री खुशबू तावडे हिने देवीच्या स्वागताची उत्साहाने तयारी केली आहे. यावेळी तिने सांगितले आहे की, 'नवरात्री साजरी करण्यासाठी मी खूप आतुर आहे. मला असे वाटते देवीं मधली जी शांतता, संयम व निर्मळपणा तो मी जोपासला हवा. आयुष्यात संयम व शांत स्वभाव असावा कारण त्यामूळे खूप मदत होते. देवीवर विश्वास ठेवून मेहेनत करत राहावं असे माझे मत आहे.

मी आमच्या मालिकेच्या सेटवर कलाकारांसोबत हा उत्सव थाटात साजरा करणार आहे. या वर्षी माझा मुलगा २ वर्षांचा झाला आहे. त्याला वेगवेगळ्या सणांबद्दल माहिती झाली आहे, म्हणून मी त्याला गरबा दांडिया खेळायला घेऊन जाईन. या सुंदर उत्सवासाठी सगळ्या भाविकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.' असे तिने म्हटलं आहे. ( Marathi Tv Serial )

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news