पुढारी ऑनलाईन डेस्क : 'सन मराठी'च्या 'सुंदरी' मालिकेत अभिनेत्री वर्षा दांदळे यांची एंट्री होणार आहे. हे सुंदरीच्या आयुष्यातील नवीन वादळ तर नव्हे? असा प्रश्नही उभा राहतो. 'सन मराठी'च्या 'सुंदरी' मालिकेत एका मागोमाग एक अनपेक्षित घटना घडत आहेत. (Sundari TV Serial) त्यामुळे प्रेक्षकही अतिशय मन लावून, कथेत रस घेऊन न चुकता ही मालिका पाहतात. प्रेक्षक या मालिकेच्या प्रत्येक एपिसोडसोबत जोडलेले आहेत हे त्यांच्या सोशल मीडीयाच्या कॉमेंट्सवरुन लक्षात येते. (Sundari TV Serial)
नुकतीच 'सुंदरी' या मालिकेत अनू आणि साहेब या दोन पात्रांची एक्झिट झाली आहे. आता पुढे काय, असा विचार अनेकांनी केलाच असेल आणि तेवढ्यात या मालिकेत नवीन एंट्री लगेच दिसून येते. अनेक मराठी मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारणा-या अभिनेत्री वर्षा दांदळे यांची 'सुंदरी'मध्ये नवीन एंट्री होणार आहे.
वर्षा दांदळे साकारत असलेल्या पात्राच्या येण्यामुळे सुंदरीच्या आयुष्यात नेमकं काय बदल घडणार, त्यांच्या येण्याने सुंदरीचं आयुष्य सुरळीत चालू राहणार की नवीन अडथळे निर्माण होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच मिळतील. त्यासाठी पाहत राहा 'सुंदरी' सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता फक्त सन मराठीवर.