पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील 'चला हवा येऊ द्या' या शोतून खळखळून हसवणारी अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugade) चर्चेत असते. शो शिवाय श्रेया सतत सोशल मीडियावर एकापेक्षा एक मराठमोळा लूकने चाहत्यांना घायाळ करत असते. सध्या तिचा आणखी एक मराठमोळा लूक चाहत्यांच्या भेटीस आला आहे. परंतु, या वेळच्या तिच्या किलर लूकवर चाहत्यांचा कॉमेन्टसचा पाऊस पडला आहे.
अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugade) तिच्या इंन्स्टाग्रामवर गोल्डन कलरच्या सहावारी साडीसोबत ब्लॉऊजमधील काही फोटो शेअर केले आहेत. या तिच्या मराठमोळ्या लूकने चाहत्याचे लक्ष वेधून घेतले आहे. केसांचा अंबाडा, त्य़ाच्यावर गजरा, कानात झुमके, कपाळावर टिकली, नाकात मुगवट, हातात सोनेरी बांगड्या, मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पुर्ण केलाय. या फोटोला पोझ देताना खास करून श्रेया एक लांब लंचक सोफ्यवर महाराणीसारखी बसलेली दिसतेय. श्रेयाची नजर आणि सौदर्याने चाहत्यांनी भूरळ घातली आहे.
हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह मराठी कलाकारांनी तिच्यांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. मराठी अभिनेता स्वप्नील जोशीने 'On point ! ?❤️', सोनाली कुलकर्णीने 'Khup sundar ❤️', अमृता खानविलकरने 'Ufffffffff', प्रार्थना बेहरेने 'Beautiful ?????', स्वानंदी टिकेकरने 'Aggga Sundari!!! So classy…Always❤️', ईशा केसकरने 'Golden beauty' असे म्हटलं आहे.
तर एका युजर्सने 'Wowwww ❤️', 'Lovely ??', 'Hayeeee ?', 'Pretty you ?❤️?', 'Reminded me of Vidya Balan?', 'he Rekha vibe❤️', 'Kya stunning be….. Mastach….', 'लूक लाईक रेखाजी ?❤️', 'Very nice…do not spoil your image..??', 'मराठी Dipika ???', 'खुप छान ❤️', 'So pretty ?❤️','?Waaaa beautiful,' 'looking gorgeous ??❤️', यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. या फोटोला आतापर्यत जवळपास १७ हजांराहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहेत.
हेही वाचा :