Actress Stretch Marks : बोल्ड फोटो टाकून ‘या’ अभिनेत्रींनी बिनधास्त दाखवले स्ट्रेच मार्क्स

disha patani
disha patani
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनय क्षेत्रात ट्रोलिंगला सामोरे जाणं, नवी गोष्ट नाही. कलाकारांचे हॉट फोटोज असो वा पार्टी लूक, बोल्ड फोटोंपासून ते वैयक्तीक लाईफपर्यंत सर्व गोष्टी समोर येत असतात. (Actress stretch marks ) इंडस्ट्रीतील अभिनेत्री आपले एकापेक्षा एक हॉट आणि बोल्ड फोटोज शेअर करते. अनेक अभिनेत्री आपल्या फोटो-व्हिडिओंमुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत राहतात. अनेक अभिनेत्री कर्वी फिगर फ्लॉन्ट करताना दिसतात. इंडस्ट्रीमध्ये काही अभिनेत्री अशा आहेत, ज्यांचे स्ट्रेच मार्क्स दिसले होते. यानंतर त्या अभिनेत्री ट्रोलही झाल्या होत्या. पण, ट्रोलिंगने त्यांना काही फरक नाही. त्या अभिनेत्रींनी बिनधास्तपणे आपल्या शरिराचे स्ट्रेच मार्क्स दाखवले आहेत. हॉट अंदाजात त्या बॉडी मार्क्स फ्लॉन्ट करताना दिसतात. (Actress stretch marks )

दिशा पटानी बॉलीवूडच्या हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर आपले हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येताना दिसते. आपला बिकिनी लुक्स नेहमीच शेअर करत असते. आपले स्ट्रेच मार्क्सदेखील ती फ्लॉन्ट करताना दिसते.

मलायका अरोरा अशी अभिनेत्री आहे, जिच्या फिटनेसमुळे तिचे वय समजत नाही. ती नेहमी आपली फिगर फ्लॉन्ट करताना दिसतेय. आपल्या वैयक्तिक आयुष्य आणि फॅशनमुळे चर्चेत असते. अनेकदा मलायका आपल्या स्ट्रेच मार्क्सना फोटोंमध्ये फ्लॉन्ट करताना दिसते.

परिणीती चोप्रा इंडस्ट्रीतील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. जेव्हा तिने डेब्यू केला होता. तेव्हा तिचं वजन खूप होतं. तिला वजन कमी करावं लागलं, ज्यामुळे तिच्या शरीरावर स्ट्रेच मार्क्स पडले.

उर्वशी ढोलकियादेखील या यादीत समाविषट आहे. टीव्हीवरील उत्तम अभिनेत्रींपैकी ती एक आहे. कोमोलिकाच्या भूमिकेतून ती घराघरात पोहोचली. अनेकदा ग्लॅमरस अवतारामुळे ती चर्चेत राहिली. अभिनेत्री उर्वशी अनेकदा बिकिनीमध्ये दिसली होती. तिच्या बिकिनी फोटोंमधून तिच्या पोटावरील स्ट्रेच मार्क्स स्पष्ट दिसले होते.

झरीन खान
झरीन खान
प्रिया आहुजा
प्रिया आहुजा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news