Rubina Dilaik : बाळाच्या आगमनाची प्रतीक्षा; अभिनव शुक्लाचं केक कापून सेलिब्रेशन

Rubina Dilaik
Rubina Dilaik

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री रुबिना दिलैक ( Rubina Dilaik ) सध्या तिची प्रेग्नेंसी एन्जॉय करत आहे. रूबिना आणि तिचा पती अभिनेता अभिनव शुक्ला जुळ्या मुलांचे पालक होणार असल्याने दोघेजण खूपच उत्साहित आहेत. दरम्यान बाळाच्या आगमनाच्या आधी रूबिनाने पती आणि तिच्या कुटुंबियासोबत केक कापून छोटासे सेलिब्रेशन केलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या 

अभिनेत्री रुबिना दिलैकने ( Rubina Dilaik ) नुकतेच तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय. यात रुबिनाचे बेबीबंप स्पष्टपणे दिसत असून अभिनव तिच्या पोटावरून प्रेमाने हात फिरवताना आणि किस करताना दिसत आहे. यावेळी रूबिना रेड- मरूम कलरच्या वनपीसमध्ये तर अभिनव कॅप आणि व्हाईट कलरच्या टिशर्ट- फॅन्टमध्ये दिसतोय.

यानंतर अभिनवने तिच्यासाठी चॉकलेट केक आणला आहे. हा केक लाल कलरच्या गुलाबांनी सजवलेला आहे. शिवाय त्यावर पांढऱ्या क्रिममध्ये 'ऑल द बेस्ट'. असा मजकूर लिहिलेला आहे. यानंतर अभिनव आणि रुबिना दोघांनी केक कापून सेलिब्रेशन केलं आहे.
व्हिडिओमध्ये रुबिनाचे आई-वडील, बहीण आणि भावजय हेही दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना रुबिनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, "कुटुंब ही आपल्या सर्वांना गरजेची गोष्ट आहे… मी माझ्या अविश्वसनीय पती, प्रेमळ पालक आणि माझे नियमित चीअरलीडर्स ज्योतिका दिलैक आणि रजत शर्मा यांची कायम ऋणी आहे…"

रुबिना सध्या नववा महिन्यात असून ती लवकरच जुळ्या मुलांची आई होणार आहे. लग्नाच्या पाच वर्षांनंतर हे कपल पालक होत आहेत. रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला यांचा विवाह २०१८ मध्ये झाला होता.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, रूबिना अभिनेता इंदर चहलसोबत आगामी पंजाबी चित्रपट दिसणार आहे. याशिवाय तिने 'शक्ती-अस्तित्व के एहसास की', 'छोटी बहू', 'बिग बॉस', 'जीने और जुजू' यासह अनेक टीव्ही शोमध्ये काम केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news