Reshma Shinde : लैला ओ लैला ??; दीपाच्या नखरेल अदा

Reshma Shinde : लैला ओ लैला ??; दीपाच्या नखरेल अदा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील 'रंग माझा वेगळा' ही मालिकेने अल्पावधीतच चाहत्यांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील दीपा या पात्राला चाहत्यांची विशेष पसंती मिळाली. दिपाच्या प्रेमळ, निस्वार्थी आणि माणूसकीच्या स्वभावाने आपसुक चाहत्यांना आपलंस करून टाकलं. या मालिकेतील दीपाची भूमिका अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) ने साकारली आहे. यासोबत ती सोशल मीडियावर फोटो शेअर करून चाहत्याच्या सपंर्कात राहत असते. आता तिचा परफार्म करतानाचा व्हिडिओसमोर आला आहे.

अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) ने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत रेश्माने ब्लॅक आणि रेड रंगाच्या साडीसोबत लाल कलरचे सिव्हलेस ब्लॉऊज परिधान केलं आहे. हा तिचा लूक खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसतोय. या व्हिडिओत खास करून ती मराठमोळ्या लूकमध्ये अप्रतिम दिसतेय. यात ती एका व्हाईट रंगाच्या संमगरंवरी दगडाच्या कमानीतून खाली उतरताना दिसतेय. यात खाली उतरल्यानंतर रेश्माच्या पैठणी साडीचा रंग बदलतो आणि तो ब्लॅक नसून ब्ल्यू कलर असल्याचा दिसतो. हा व्हिडिओच्या बॅकग्राऊटला 'लैला ओ लैला' हे हिंदी गाणे वाजत आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यात एका युजर्सने 'Khup khup khup sundar diste aahe Tai….❤️'.असे म्हटलं आहे. याशिवाय रेश्मा शिंदेचे आणखी काही पैठणीतील फोटो सोशल मीडि'यवर पाहायला मिळतात.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news