Actress Laila Khan Murder Case : सावत्र पित्याने मुलीचा खून करून गाडलं होतं बंगल्यात; १३ वर्षांनंतर दोषी

Laila Khan
Laila Khan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री लैला खान खूप प्रकरणात सत्र न्यायालयाने तिचे सावत्र वडील परवेज टाक यांना दोषी ठरवले. (Actress Laila Khan Murder Case) २०११ च्या खून प्रकरणी परवेज यांच्यावर सावत्र मुलगी लैलासह तिची आई आणि चार भाऊ-बहिणींचा खून करण्याचा आरोप होता. (Actress Laila Khan Murder Case)

परवेज टाकला आयपीसी अंतर्गत हत्या आणि पुरावे नष्ट करणेसह इतर गुन्ह्यांमध्ये दोषी आढळले. परवेज टाक हा अभिनेत्री लैलाची आई सेलिना हिचा तिसरा पती होता. लैला, आई सेलिना आणि तिचे चार भाऊ-बहिणींची इगतपुरीतील एका बंगल्यात खून झाला होता. रिपोर्टनुासर, टाकचे सेलिनाच्या संपत्तीवरून वाद झाला होता. त्याने सर्वात आधी तिचा खून केला. या खुनाच्या काही महीन्यांनंतर टाकला जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केली होती.

त्याने फेब्रुवारी २०११ मध्ये लैला आणि त्याच्या आईसह सहा लोकांची हत्या करून सर्वांचे मृतदेह इगतपुरीमध्ये लैलाच्या फार्महाऊसमध्ये गाडले होते. आता या हत्याकांडात कोर्टाने आरोपी परवेज इकबाल टाकला दोषी ठरवले आहे. शिक्षेवर सुनावणी १४ मे रोजी होईल. डीएनए परीक्षणानंतर हाडाच्या सापळ्यांची ओळख झाली होती. टाकने तथाकथित चौकशीत पोलिसांना सांगितलं की, त्याला त्याच्या पत्नीची दुसरा पती आसिफ शेखसोबत जवळीकता आवडायची नाही.

कोण होती लैला खान?

लैला खानने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात २००२ मध्ये कन्नड चित्रपट 'मेकअप'मधून केली होती. पण, खरी ओळख राजेश खन्ना स्टारर चित्रपट 'वफा : ए डेडली लव्ह स्टोरी' मधून मिळाली. हा चित्रपट २००८ मध्ये रिलीज झाला होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपटदेखील सुपर फ्लॉप ठरला होता. या चित्रपटाची चर्चा त्यातील बोल्ड दृश्यांमुळे झाली होती. राजेश खन्ना आणि लैला खान यांच्यात अनेक बोल्ड दृश्य या चित्रपटात होते. हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर लैला सी ग्रेड चित्रपटांमध्ये काम करू लागली.

लैला खान आणि तिची आई शेहलिना खानसह तिच्या परिवारातील पाच सदस्य बेपत्ता झाल्याची तक्रार लैलाचे वडील आणि पिता आणि तिच्या आईचे पहिले पती नादिरशाह पटेलने दिली होती. शेहलिना खान (५९), मोठी मुलगी अजमीना पटेल (३२), दुसरी मुलगी लैला (३०), जुळी मुले जारा आणि इमरान (२५) आणि एक अन्य नातेवाईक रेशमा सगीर खान उर्फ ​​टल्ली (१९) यांचा खून करून मृतदेह फार्म हाऊसमध्ये गाडले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news