Jacqueline Fernandez : ‘जॅकलिनने जाणुनबुजून सुकेश चंद्रशेखरच्या पैशांचा वापर केला’

Jacqueline Fernandez : ‘जॅकलिनने जाणुनबुजून सुकेश चंद्रशेखरच्या पैशांचा वापर केला’

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी पुन्हा वादात सापडली आहे. तथाकथित फसवणूक करणारा महाठग सुकेश चंद्रशेखरकडून जॅकलिन काही रक्कम जाणूनबुजून स्वीकारत असल्याची आणि त्या पैशाचा वापर करत होती. असा तर्क ईडीने जॅकलिनने दाखल केलेल्या याचिकेच्या उत्तरादाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. ईडीने दिल्ली उच्च न्यायालयासमोर असे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

हे प्रकरण न्यायाधीस जस्टिस मनोज कुमार ओहरी यांच्यासमोर मांडण्यात आले. फर्नांडिसच्या वकिलाने ईडीच्या प्रतिज्ञापत्राला प्रत्युत्तर देण्यासाठी वेळ मागितली आहे. या याचिकेत जॅकलिनने चंद्रशेखर यांच्याशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे.

संबंधित बातम्या 

काय म्हणाली ईडी?

उच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ एप्रिलला सांगितली आहे. उत्तरादाखल ईडीने दावा केला आहे की, फर्नांडीसने कधी चंद्रशेखर सोबतच्या आर्थिक देवाणघेवाण बाबतीत सत्याचा खुलासा केला नाही. पुरावे मिळेपर्यंत नेहमीच खऱ्या गोष्टी लपवल्या.

याशिवाय या प्रकरणाच्या सुरुवातीला जॅकलिनने आपल्या वक्तव्याने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत सुकेश चंद्रशेखर खरा गुन्हेगार असल्याचा दावा केला होता. तथापि, तपासादरम्यान, जॅकलिनला सुकेशकडून छळ झाल्याचे सिद्ध करण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत. यामुळे जॅकलिन त्याच्यासोबत या गुन्हात असल्याचे म्हटलं जात आहे.

जॅकलिनला चंद्रशेखरच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती होती, तरीही तिने स्वत:साठी आणि तिच्या कुटुंबातील या गुन्ह्यातून पैसे मिळवले, त्या पैसाचा स्वत: साठी उपयोग केला असल्याचेही तपास यंत्रणेने म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news