Debina Bonnerjee : देबिनाने तीन महिन्यानंतर दाखविली मुलीची पहिली झलक

Debina Bonnerjee
Debina Bonnerjee

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'रामायण' फेम अभिनेत्री देबिना बॅनर्जी आणि अभिनेता गुरमीत चौधरी यांच्या घरी ६ नोव्हेंबर २०२२ रोजी एका परिचं आगमन झालं. यानंतर देबिनाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून दुसऱ्या मुलीचे नाव 'दिविशा' ठेवले असल्याची माहिती दिली होती. मात्र, या फोटोत दिविशाचा स्पष्ट चेहरा दिसत नव्हता. यानंतर आता जवळपास तीन महिन्यानंतर देबिनाने ( Debina Bonnerjee ) मुलीची पहिली झलक दाखविली आहे.

अभिनेत्री देबिना बॅनर्जी ( Debina Bonnerjee ) आणि अभिनेता गुरमीत चौधरी यांनी इन्स्टाग्रामवर नुकतेच एक फॅमिली फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोत देबिना आणि गुरमीतसोबत त्याच्या दोन्ही मुली दिसत आहेत. जन्मानंतर दोघांनी पहिल्या मुलीचे नाव 'लियाना' तर दुसऱ्या मुलीचे नाव 'दिविशा' असे ठेवले आहे. या फोटोत खास करून देबिनाने दिविशाला आणि गुरमीतने लियानाला हातात घेतले आहे.

या फोटोच्या कॅप्शममध्ये त्यांनी 'Hi World! That's my miracle baby @divishaadiva ??, Good vibes & blessings always ?? #myfamily?'. असे लिहिले आहे. यावेळी देबिना पर्पल कलरच्या ड्रेस तर गुरमीतने रॉयल ब्लू कलरच्या कोट- पँटमध्ये हॅडसम दिसला. तर लियाना गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये आणि दिविशा पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. हा फॅमिलीसोबतचा फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे.

सोशल मीडियावर हा फोटो शेअर होताच चाहत्यांनी त्याच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव करत आहे. यात 'hey both look like guru??? Congratulations!!', 'Beautiful ❤️❤️God bless them & you both', 'So cute ❤️❤️', 'Liana and divishaa look same……masallah.allah bless ur babies and ur family ❤️', 'Oh my goddd❤️❤️❤️❤️ No difference…seems like both are twins?'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजी शेअर केल्या आहेत. या फोटोला ५ तासांत जवळपास दोन लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

देबिना आणि गुरमीत अनेक वर्षांच्या डेटिंगनंतर २०११ मध्ये लग्न बंधनात अडकले. यानंतर तब्बल ११ वर्षानंतर देबिनाने मुलगी लियाना जन्म दिला. यानंतर ६ नोव्हेंबर २०२२ रोजी तिने दुसरी मुलगी दिविशा जन्म दिला. दिविशाच्या जन्मानंतर तब्बल तीन महिन्यानी त्याच्या मुलीची झलक पाहायला मिळाली आहे.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Debina Bonnerjee (@debinabon)

 

View this post on Instagram

 

A post shared by Debina Bonnerjee (@debinabon)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news