Ashwini Mahangade : कष्टाचं फळं अन् नानांचा आशिर्वाद; आश्विनीनं ‘हे’ स्वप्न केलंय पूर्ण (video)

Ashwini Mahangade
Ashwini Mahangade

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' मालिकेतून अभिनेत्री आश्विनी महांगडे (Ashwini Mahangade) हिने जबरदस्त अभिनयाची छाप पाडली आहे. या मालिकेत तिने 'अनघा' ची मुख्य भूमिका उत्तम साकारून चाहत्यांचे मनोरंजन केलं आहे. या सगळ्यासोबत आश्विनी सोशल मीडियावरही तिचे एकापेक्षा एक मराठमोळा लूक शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सध्या नुकतेच तिने तिच्या दिवगंत बाबांचे स्वप्न पूर्ण केलं आहे.

अनघा म्हणजेच अभिनेत्री आश्विनी महांगडे (Ashwini Mahangade) हिने नुकतेच तिच्या बाबांचे म्हणजे नानांचे स्वप्न पूर्ण करत लाल रंगाच्या एक्सयुव्ही (XUV) चारचाकी गाडी घेतली आहे. या गाडीचे फोटो आणि व्हिडिओ तिने तिच्या इंन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यावेळी खास करून तिने परिधान केलेल्या मरूम रंगाच्या नऊवारी साडीत तिचे सौदर्य खुलून दिसत आहे. आश्विनीसोबत तिचे कुटूंबियदेखील तिच्यासोबत गाडीचे पूजन करताना आनंदात आणि उत्साहात होते. ही गाडी घेण्याचे स्वप्न तिच्या बाबां म्हणजे, नानांचे असल्याने ती थोडी भावूक झाली आहे.

आश्विनीने 'आयुष्यात काही स्वप्नं आपल्या अगोदर आपले आई-वडील पाहत असतात. नानांनी माझ्यासाठी पाहिलेले प्रत्येक स्वप्न मला पुर्ण करायचे आहे. त्यातले हे एक❤️. खरतरं आज नाना असायला हवे होते खुप मन भरून आले असते त्यांचे. पण नाना कायम माझ्यासोबत माझी ताकत म्हणून उभे आहेत असं मला वाटते. त्यांच्याचं आशीर्वादामुळे हे सगळं करू शकतेय. मी नानांचे प्रत्येक स्वप्न पुर्ण करण्यासाठी दिवस रात्र कष्ट करेन हीच नवीन वर्षाची सुरूवात. ???,खरं तर मी गाडी घेतली पण त्याचा आनंद माझ्या माणसांना सगळ्यात जास्त झाला. गाडीचे एव्हढे जंगी स्वागत त्यांच्यामुळे झाले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मी समाधानी झाले. सर्वांचेच मनापासून आभार ??, असेच आपले आशीर्वाद व शुभेच्छा कायम सोबत ठेवा. ♾❤️? स्व-कष्टाचं फळं ???, नानांचा आशिर्वाद ??.' अशी भली मोठी कॅप्शन लिहिली आहे.

अश्विनी मध्यमवर्गीय कुटुंबातून सिनेसृष्टीत आली आहे. तिचे वडील शेतकरी होते. काही दिवसांपूर्वी तिचे वडील गेले आणि तिच्यावर सर्व जबाबदारी पडली. ती वडिलांनाच नाना य़ा नावाने बोलवायची. ते हयात असताना आपल्या मुलगीने गाडीतून फिरावे अशी त्याची इच्छा होती. ती पूर्ण केल्याचे अश्विनीने सोशल मीडियावरून सांगितले आहे. हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह अनेक मराठी कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. यात अभिनेत्री ऋतुजा बागवे, अभिषेक देशमुख आणि ऋतुजा जुन्नरकर यांनी शुभेच्छा दिल्या.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news