Heart of Stone : हॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी अभिनेत्री आलिया भट्ट सज्‍ज; फर्स्ट लूक आला समोर

Heart of Stone : हॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी अभिनेत्री आलिया भट्ट सज्‍ज; फर्स्ट लूक आला समोर

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'ब्रह्मास्त्र' च्या भरघोस कमाईनंतर बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. आलियाचा नेटफ्लिक्सवर आगामी 'हार्ट ऑफ स्टोन' (Heart of Stone) हा चित्रपट येतोय. या चित्रपटातील आलियाचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

अभिनेत्री आलिया भट्टच्या इन्स्टाग्रामवर आगामी 'हार्ट ऑफ स्टोन' (Heart of Stone)या चित्रपटाची एक झलक पाहायला मिळाली. शेअर झालेल्या लूकमध्ये पहिल्यांदा रस्त्यावरून आणि वाळवंटातून वेगाने जाणार्‍या बाईकच्या शॉट्स दिसत आहेत. याच दरम्यान तुम्ही कशासाठी साइन अप केलंय हे तुम्हाला माहिती आहे, कोणी मित्र नाहीत, नातेसंबंध नाही, आपण काय करतो ते खूप महत्वाचे आहे. असे हलक्याशा आवाजात म्हटलं गेलं आहे. यावेळी आलियाचे देखील ॲक्शन सीन दाखवण्यात आलं आहे. या लूकवरून आलिया चित्रपटात मुख्य भूमिका साकारत असल्याची माहिती मिळतेय.

'हार्ट ऑफ स्टोन' या चित्रपटात आलियासोबत जेमी डोर्नन आणि गॅल गॅडोट यांनी मुख्य भूमिका साकरल्या आहेत. हा चित्रपट ॲक्शन थ्रीलर सीनवर आधारित आहे. हा चित्रपट पुढील वर्षी २०२३ मध्ये भेटीस येणार आहे. ब्रह्मास्त्रनंतर आलियाचा हॉलिवूड चित्रपटात दिसणार म्हणून चाहत्याच्या उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news