Siddharth Chandekar : ‘म्हणून मी गायक नाही बनलो?’…. (video)

Siddharth Chandekar
Siddharth Chandekar

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या अभिनयामुळे चर्चेत असलेला मराठमोळा अभिनेता म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर ( Siddharth Chandekar) आणि त्याची पत्नी अभिनेत्री मिताली मयेकर दोघेही सोशल मीडियावर चर्चेत असतात. सिद्धार्थ आणि मितालीनं लंडन वारी असो वा दिवाळीची पार्टी दोन्हीही हटके पद्धतीने साजरी केली आहे. याच दरम्यान सिद्धार्थचा एका व्हिडिओ समोर आला आहे. यातून त्याने स्वत: गायक का होवू शकलो नाही याबद्दलची माहिती दिली आहे. हा एक फनी व्हिडिओ आहे.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने (Siddharth Chandekar) त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फनी व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो व्हाईट रंगाच्या कुर्त्यात एकदम हॅडसम दिसतोय. त्याने शेअर केलेल्या व्हिडिओत तो गाणे म्हणण्याच्या मूडमध्ये दिसतोय. परंतु, त्याच्या बॅकग्राऊडला होणाऱ्या मोठ्या आवाजाने त्याच्या गाण्यात अडथळे येत आहेत. तो पुन्हा- पुन्हा गाणं म्हणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्याचा आवाज ऐकू येत नाही. हा त्याचा फनी व्हिडिओ जोरदार सोशल मीडियावर होत आहे.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सिद्धार्थने 'म्हणून मी गायक नाही होऊ शकलो?. असे लिहिले आहे. यावरून त्याला मध्येच वाजणाऱ्या बॅकग्रांऊडच्या आवाजामुळे मी स्वत: एक चांगला गायक होवू नाही शकल्याचे म्हणायचं आहे. यात खास करून त्याच्या हाताच्या मुद्रा, अभिनय आणि हावभाव देखील खूपच खास आहे. यात त्याने माईक म्हणून टिव्हिचा रिमोट पकडला असून तो शेवटी रागाने जोरात फेकताना दिसतोय. हा व्हिडिओ चाहत्याच्या पंसतीस उतरला आहे.

सिद्धार्थच्या या व्हिडिओवर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर, प्रार्थना बेहेरे, मंजिरी ओक, आदर्श शिंदे आणि सुखदा खांडेकर यांनी हास्याचे ईमोजी शेअर केले आहेत. तर काही युजर्सनी 'Arreyy!!! ??', 'एक कोहिनूर गमावला गायन क्षेत्राने ?', 'Hahahahhaha❤️❤️', 'भाई एक नंबर?', 'Kye mast singer ahe ha khup pach masta ??', '??? अगदी खर बोललास ??', 'Pan tu khup changala actor ahes❤️', '?baapree !', 'With remote गायक… सही ??', 'सर्वात भारी अभिनेता ??', यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी फक्त हास्याचे ईमोजी शेअर केले आहेत. हा व्हिडिओला आतापर्यत जवळपास ७ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news