Salman Khan : बकरी ईदनिमित्त खान फॅमिली एकत्र; अर्पिताही स्पॉटेड

Salman Khan
Salman Khan

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशात आषाढी एकादशीसोबत बकरी ईद काल मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्याच्या मित्रपरिवारासह हा सण दणक्यात साजरा केला. यात बॉलिवूडचे सुपरस्टार सलमान खान म्हणजे, भाईजानही ( Salman Khan ) कसा मागे राहील. सलमाननेही कुंटूबियासोबत ईद धुमधडाक्यात साजरी केली. खास करून कुटूबियांसोबतचा एका फोटो सलमानने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहच्यांनी भरभरून कौतुक करत बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

बॉलिवूडचे सुपरस्टार सलमान खानने ( Salman Khan ) बकरी ईदच्या निमित्ताने कुटूंबियांसोबतचा एक फोटो शेअर करून ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आल्याची माहिती दिली आहे. या फोटोत सलमानचे वडील सलीम खान, आई सलमा खान, दोन्ही भाऊ अरबाज खान-सोहेल खान आणि दोन्ही बहिणी अलविरा खान आणि अर्पिता खानसोबत दिसत आहे. तर सलमान त्याच्या पालकांच्या मागे उभा असून सुंदर फोटोला पोझ दिली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, 'ईद उल अदा मुबारक.' (EID UL ADHA MUBARAK). मात्र. फोटोतून सलमानची बहिण अर्पिताने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलंय.

सलमान हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव करत ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोवर १८ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स आणि कॉमेन्टस केल्या आहेत. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, सलमान खान लवकरच 'टायगर ३' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news