![rajinikanth](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F05%2Frajini.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेते रजनीकांत यांनी दिवंगत अभिनेते सरथ बाबू यांच्या चेन्नईतील निवासस्थानी जाऊन त्यांना अखेरची श्रद्धांजली वाहिली. सरथ बाबू यांचे काल निधन झाले होते.
ते (सरथ बाबू) एक चांगले व्यक्ती होते. मी त्यांना कधीच रागावलेले पाहिले नाही. त्यांचे सर्वच चित्रपट खूप गाजले. त्यांच्या मनात माझ्याबद्दल खूप प्रेम होते. त्यांच्या निधनाने मला दु:ख झाले आहे, असे रजनीकांत म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.
तेलुगु दिग्गज अभिनेते सरथ बाबू (Sarath Babu) यांचे वयाच्या ७१ वया वर्षी निधन झाले. दीर्घकाळ आजारी असल्यामुळे त्यांच्य़ावर हैदराबादमधील एआयजी रुग्णालयात उपचार सुरू होते. सरथ बाबू यांना रुग्णालयात दाखल करून एक महिन्यांहून अधिक काळ झाला होता. सोमवारच्या सकाळी अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि अनेक अवयव निकामी झाले.