Paresh Rawal : अभिनेते परेश रावल यांचा ‘त्‍या’ वादग्रस्‍त विधानाबाबत माफीनामा

Paresh Rawal
Paresh Rawal

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता परेश रावल (Paresh Rawal) सध्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आहेत. गुजरात निवडणुकीत वलसाड येथे भाजप उमेदवाराच्‍या जाहीर सभेत त्यानी बेकायदेशीर बांगलादेशी आणि रोहिंग्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. या प्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. आता त्‍यांनी या विधानावर सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून माफी मागितली आहे.

अभिनेता परेश रावल (Paresh Rawal) यांनी ट्विटरवरून माफी मागताना म्हटलं आहे की, 'माझे विधान हे बंगाली म्हणजे बेकायदेशीर बांगलादेशी आणि रोहिंग्या यांच्यासंदर्भात होते. माझ्या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी मनापासून  त्यांची माफी मागतो.'

काय म्‍हणाले होते परेश रावल ?

वलसाड येथील जाहीर सभेत परेश रावल म्‍हणाले होते की, "गॅस सिलिंडर महाग झाले आहे; पण भविष्यात ते स्वस्त होतील. आपल्या देशातील नागरिकांना रोजगार मिळेल. परंतु, बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिम नागरिक तुमच्या आजूबाजूला राहू लागतील. ही परिस्थिती दिल्लीची आहे. गॅस स्वस्त झाल्यावर तुम्ही तो खरेदी करू शकाल, परंतु, बांगलादेशीसाठी त्यावर मासे शिजवणार का? गुजरातचे नागरिकांना महागाई सहन करू शकतील, परंतु, शेजारील बांगलादेशी आणि रोहिंग्यांना नाही."

परेश रावल यांच्या वादग्रस्त व्यक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले. सोशल मीडियावरून त्यांच्यावर टीकेची झोड उडाली.  सीपीआय नेते मोहम्मद सलीम यांनी रावल यांच्‍या विरोधात फिर्याद दिली. यानुसार त्‍यांच्‍यावर गुन्‍हाही दाखल झाला. आता परेश रावल यांनी आपल्‍या विधानावर माफी मागत या प्रकरणावर पडदा टाकण्‍याचा प्रयत्‍न केला आहे.

हेही वाचा :  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news