पुढारी ऑनलाईन डेस्क – ॲण्ड टीव्हीवरील नवीन मालिका 'अटल' दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या बालपणीच्या न सांगण्यात आलेल्या पैलूंना सादर करण्यास सज्ज आहे. (Atal TV Serial ) लक्षवेधक प्रोमोसह सर्वत्र या मालिकेची चर्चा सुरू आहे. नुकतेच समजलेल्या बातमीनुसार प्रख्यात मराठी अभिनेते मिलिंद दस्ताने यंग अटलचे आजोबा श्याम लाल वाजपेयी यांची भूमिका साकारणार आहेत. (Atal TV Serial )
संबंधित बातम्या –
युफोरिया प्रॉडक्शन्सद्वारे निर्मित ही मालिका भारताच्या भवितव्याला आकार देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या या नेत्याच्या सुरूवातीच्या काळाला दाखवणार आहे. भारतातील ब्रिटीश वसाहतवादी राजवटीच्या पार्श्वभूमीवर ही मालिका अटल बिहारी वाजपेयी यांच्या बालपणाला सादर करेल. तसेच घटना, विश्वास व आव्हानांवर प्रकाश टाकेल, ज्यामुळे ते महान नेते ठरले.
मिलिंद दस्ताने आपल्या भूमिकेबाबत सांगताना म्हणाले, "श्याम लाल वाजपेयी भागवत कथा वाचण्यात मग्न झाले आणि त्यांनी ज्योतिष व धर्मग्रंथांचा अभ्यास करून उदरनिर्वाह केला. श्याम लाल जीवनाप्रती उत्साही होते. त्यांनी नेहमी उत्साहीपणा दाखवला, दु:खातही आनंद शोधला आणि रागाच्या क्षणीही करमणूक केली. त्यांच्या आनंदी स्वभावाचा अटल यांच्यावर सखोल परिणाम झाला. कामासाठी समर्पित असण्यासह श्याम लाल यांनी चिंतन आणि योगाचे महत्त्व सांगितले. श्याम लाल वाजपेयी यांच्या चातुर्याने अटल यांच्यावर कायमचा ठसा उमटवला."
यंग अटलच्या आजोबांची भूमिका साकारण्याबाबत आनंद व्यक्त करत मिलिंद दस्ताने म्हणाले, "मी टेलिव्हिजनवर अशी मोठी भूमिका साकारण्यास खूप उत्सुक आहे. मालिकेचे कथानक विनम्र कुटुंबातील प्रामाणिक मुलगा आणि भारताचे महान नेते अटल बिहारी वाजपेयी यांची प्रेरणादायी कथा सादर करते. या भूमिकेसाठी विचारण्यात आले तेव्हा मी होकार देण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार केला. कारण या भूमिकेमध्ये मोठी जबाबदारी आहे.
अटलजींच्या आजोबांबाबत फारसे माहित नसल्यामुळे मी चिंतित होतो. पण, मी आव्हान स्वीकारले आणि हिंदी टेलिव्हिजन मालिकेमध्ये अशी महत्त्वपूर्ण भूमिका साकारण्याकडे संधी म्हणून पाहिले. वर्कशॉपमुळे मला भूमिकेसाठी सखोलपणे तयारी करण्यास मदत झाली, तसेच माझ्या भूमिकेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यास देखील मदत झाली.
निर्मात्यांनी माझी तयारी करून घेण्यामध्ये आणि अटलजींच्या खऱ्या आजोबांप्रमाणे हुबेहूब लूक तयार करण्यामध्ये उत्तम कामगिरी बजावली. मी याप्रती प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास उत्सुक आहे."